शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग - २ जमीन विक्रीच्या परवानगी प्रकरणात  कलेक्टरचे अधिकार वापरले इतरानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 12:53 IST

सिलिंग, वर्ग-२ हस्तांतरणासंदर्भातच्या जमीन विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे ताशेरे चौकशी समितीने अहवालामध्ये ओढले आहेत.

ठळक मुद्देदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे विभागीय आयुक्तांनी पाच अधिका-यांची एक समिती नेमली होती. निवासी उपजिल्हाधिका-यांनी दिलेल्या विक्री परवानग्या अधिकारबाह्य असल्याचे ताशेरे चौकशी समितीने ओढले आहेत.

औरंगाबाद : सिलिंग, वर्ग-२ हस्तांतरणासंदर्भातच्या जमीन विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे ताशेरे चौकशी समितीने अहवालामध्ये ओढले आहेत. या जमिनींचे व्यवहार होताना त्रुटी निर्माण झाल्या असून, निवासी जिल्हाधिका-यांनी जिल्हाधिका-यांचे अधिकार वापरल्याची बाब पुढे आली आहे. 

जिल्ह्यात वर्ग-२ जमीन विक्री परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी दोन उपजिल्हाधिका-यांसह तहसीलदार, नायब तहसीलदारांचा समावेश असलेल्या पाच अधिका-यांची एक समिती नेमली होती. त्या समितीने आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. सिलिंग जमीन अधिनियमामध्ये जमीन विक्री परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना आहेत; परंतु त्या परवानग्या निवासी उपजिल्हाधिका-यांनी दिलेल्या आहेत. कमाल जमीन धारणा कायद्यासंबंधीचे कामकाज अपर जिल्हाधिका-यांकडे असते. त्याचप्रमाणे औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिका-यांना जमीन अधिनियमातील कलम २ (६) अन्वये जिल्हाधिका-यांचे अधिकार दिल्याबाबतची कोणतीही अधिसूचना नसल्यामुळे निवासी उपजिल्हाधिका-यांनी दिलेल्या विक्री परवानग्या अधिकारबाह्य असल्याचे ताशेरे चौकशी समितीने ओढले आहेत. गायरान जमीन विक्री परवानग्यांच्या १९ प्रकरणांमध्येही मूळ मंजुरी आदेशाची प्रत उपलब्ध नसणे, भूसंपादन अधिका-यांचा अभिप्राय नाही, तसेच काही प्रकरणांमध्ये खरेदीदार शेतकरी आहे की नाही, या बाबीही तपासण्यात आल्या नाहीत. 

महार हाडोळा जमीन विक्री परवानगीसाठी जिल्हाधिका-यांचे अधिकार वापरण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सक्षम राहतील, असे आदेश आहेत. तपासणी वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी तीन वर्षांत दिलेल्या परवानग्या समितीने तपासल्या. यामध्ये उपजिल्हाधिका-यांनी अधिकार नसताना सुनावणी घेऊन जबाब नोंदविणे, पुरावे तपासणे आदी बाबी करून संकेत पाळले नसल्याचे समितीचे मत आहे. ४२ पैकी ८ प्रकरणांत अर्जदाराच्या ताब्यातील जमिनीच्या वहितीचा कालावधी १० वर्षांपेक्षा कमी असताना ही विक्री परवानगी दिल्याचे दिसून आले आहे. 

२००६ नंतरच्या बदलांचे काय२००६ पर्यंत उपजिल्हाधिकारी भूसुधार प्रकरणात निर्णय घ्यायचे. २००६ नंतर या पदाचे रूपांतर उपजिल्हाधिकारी महसूल तथा सामान्य प्रशासन असे करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिका-यांना भूसुधार करण्याचे स्वतंत्र अधिकार नाहीत, तर सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिका-यांना वाटप केलेल्या विषयानुसार अधिकार आहेत. २००६ नंतर निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्यातील कामकाजाचे वाटप करण्यात आले. शासनाने हे भूसुधारचे अधिकार देण्यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त के.बी. भोगे यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यांनी खातेविभाजन करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर राज्यभरात सामान्य प्रशासन उपजिल्हाधिका-यांकडे भूसुधारचे अधिकार देण्याचा पॅटर्न लागू करण्यात आला; परंतु अधिकार विभाजनाचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाला आजवर प्राप्त झालेले नाहीत. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी