शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बाभळगावच्या विलासबागेतील समाधीस्थळी उसळला जनसागर...

By admin | Updated: May 27, 2015 00:41 IST

लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या समाधीस्थळी

लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या समाधीस्थळी देशमुख कुटुंबियांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी विलासरावांच्या लोकसेवेचा जीवनपट सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. विलासरावांच्या आठवणी अनेकांना दाटून आल्या. प्रदीर्घ राजकीय कालखंडात विलासरावांनी सामान्य माणसांचा व मागासलेल्या भागांचा विकास करण्यासाठी कार्य केले, हे कोणालाही विसरता येणार नाही. म्हणूनच आदरांजली वाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. प्रारंभी विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांनी विलासराव देशमुख यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. त्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, सिनेअभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, गौरवी देशमुख-भोसले, अवीर, अवान, रियान, आकांक्षा, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंहराव देशमुख, नाथसिंह देशमुख, विवेक जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार अ‍ॅड. त्रिंबक भिसे, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, माजी आ. चंद्रशेखर भोसले, ‘मांजरा’चे माजी चेअरमन धनंजय देशमुख, जगदीश बावणे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, यशवंत पाटील, विजय देशमुख, संतोष देशमुख, राजेश्वर निटुरे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, बसवराज पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, लक्ष्मीकांत कर्वा, उपमहापौर कैलास कांबळे, व्ही.बी. पाटील, प्रा. राजकुमार जाधव, नरेश पंड्या, भानुदास डोके, कल्याण पाटील, शाम देशमुख, विद्याधर कांदे-पाटील, लक्ष्मण मोरे, लालासाहेब देशमुख, लालासाहेब चव्हाण, तात्यासाहेब देशमुख, प्रताप पाटील, प्रताप पडिले, दगडूसाहेब पडिले, राजकुमार आकनगिरे, किसनराव लोमटे, माधव गंभीरे, अमर भोसले, मन्मथ किडे, रमेश राठी, रमेश देशमुख, संभाजी सूळ, राम कोंबडे, एस.डी. बोखारे, दत्ता शिंदे, डॉ.एस.एन. जटाळ, प्रदीप राठी, ललितभाई शहा, राजकुमार पाटील, सहदेव मस्के यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)सूरमणी बाबूराव बोरगावकर व तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्या संचाने भजनसेवा दिली. संगीतमय आदरांजली बोरगावकर बंधूंनी यावेळी अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले. यावेळी आर.ई. सोनकांबळे, नबी नळेगावकर, संजय निलेगावकर, दौलतराव कदम, संजय जगताप, गट्टू अग्रवाल, डॉ. संजय पौळ, भैरवनाथ सूर्यवंशी, पप्पू देशमुख, गोविंद पारिख, भागवत सोट, सूर्यकांत शेळके, अ‍ॅड. श्रीरंग दाताळ, डॉ. ब्रिजमोहन झंवर, गणपतराव बाजुळगे, फक्रुद्दीन पटेल, सतीश हलवाई, राजू पाटील, श्यामराव सूर्यवंशी यांनीही आदरांजली वाहिली.महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सदस्य व मांजरा, विकास, रेणा आणि जागृती सहकारी साखर कारखान्यातील संचालक, पदाधिकारी, विविध सेवा सहकारी संस्थांचे संचालक, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी विलासरावांना आदरांजली अर्पण केली.