पैठण : पैठण- शेवगाव रस्त्यावरील शहागड चौकाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन नामफलकाचे अनावरण सुनील वीर यांनी केले. धनगर समाजाच्या मागणीची दखल घेत पैठण नगर परिषदेने चौकाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. राजमाता अहिल्यादेवींचे नाव दिल्याने धनगर समाजबांधवांनी नगर परिषदेचे आभार व्यक्त केले. तर गुरुवारी चौकात नामफलकाचे अनावरण केले गेले. यावेळी चंद्रकांत झारगड, धोंडिराम वाघे, बाबासाहेब शिपणकर, अनिल वीर, विजय गरगडे, नारायण ढापसे, अंकुश गंगले, अक्षय ढवळे, जगदीश वीर, संभाजी वीर, मंगेश वीर, सोमनाथ वीर, भाऊसाहेब सासवडे, एकनाथ सरोद, ज्ञानेश्वर अंतरकर, राजेंद्र शिपणकर, सोमनाथ शिपणकर, एकनाथ शिपणकर, सचिन अंतरकर, सचिन सोरमोरे, राजू पाचे, योगेश पाचे आदींची उपस्थिती होती.
अहिल्यादेवी होळकर नामफलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:05 IST