चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या डोणवडा गावातील नारायण अश्रुबा पवार हे कुटुंबासमवेत ८ डिसेंबर रोजी शेतात गेले होते. तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञातांनी सोन्याचे नेकलेस, चांदीचे ब्रास्लेट, सोन्याचे मणी, सोन्याचा कानातील बाळी ,नाकातील नथ व रोख २८६० रुपये घेऊन फरार झाले. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर विशाल दारासिंग भोसले, परहरी नेमाजी काळे, रोहित नादर चव्हाण (रा.बिडकीन) या तिघांना अटक करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, डी. डी. वाघमारे, जमादार नंदू दांडगे, विजय पाखरे, प्रशांत नांदे यांनी केला.
फोटो - डोणवडा येथील चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीसह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. वाघमारे.