लातूर : लातूर तालुक्यातील कारसा-काडगाव शिवारात एका अज्ञात ३० वर्षीय युवकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा उलगडा अद्याप झाला नाही. घटना घडून बारा दिवस उलटले तरी अद्याप मयताचीही ओळख पटली नसून, खुनीही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गेल्या सहा महिन्यांत या पोलिस ठाण्याअंतर्गत चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील दोन प्रकरणांचा तपास लागला आहे. परंतु, कारसा शिवारातील आणि त्यापूर्वी झालेल्या रामेगाव शिवारातील खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. कारसा काटगाव शिवारात ६ डिसेंबर रोजी एका पुलाखाली मृत आणि छिन्नविछिन्न अवस्थेत एका ३० वर्षीय तरुणाचा सडलेला मृतदेह आढळला. त्या मृतदेहाची उतरीय तपासणी केल्यानंतर हा खून असल्याचे उघड झाले आहे़ परंतु त्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही़ या खुनाच्या तपासासाठी बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पोलिस पथक पाठविण्यात आले आहे. कुठल्याही पोलिस ठाण्यात मिसिंगची घटना दाखल झाली असेल तर त्या-त्या पोलिस ठाण्याने किंवा ज्या नागरिकाला माहिती मिळाली आहे, त्याने गातेगाव पोलिस ठाण्याशाी संपर्क साधावा़ त्याचे नाव गुप्त ठेवून परितोषिक दिले जाईल, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे़ तरीही खुनाचा तपास लागत नाही. गातेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत गेल्या सहा महिन्यांत चार खुनाच्या घटना झाल्या आहेत़ त्यापैकी गोंदेगाव व साखरा परिसरात झालेल्या खुनातील आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पण रामेगाव व कारसा- काटगाव शिवारातील खुनाबाबत उलगडा झाला नाही. (प्रतिनिधी)४१२ दिवसाचा कालावधी होऊनही गातेगाव हद्दीतील खुनाचा उलगडा होत नसल्याने याबाबत बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये मिसिंगची तक्रार दाखल आहे का, याचा शोध घेण्यासाठी गातेगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पथक रवाना झाले आहे़ ४या खुनाच्या घटनेबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ गातेगाव पोलिसात संपर्क साधावा़ माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेऊन त्याने केलेल्या कामगिरीबद्दल बक्षीस देण्यात येईल, असे सपोनि. दसरथ वाघमोडे यांनी सांगितले.
गातेगाव हद्दीतील खुनाचे गूढ उलगडेना
By admin | Updated: December 19, 2014 00:57 IST