शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सुविधांबाबत हलगर्जीपणा

By admin | Updated: June 29, 2014 01:06 IST

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला.

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन रुग्णांना इतरत्र हलवावे लागले. या गोंधळामुळे रुग्ण दगावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे येथील सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल्समधील आयसीयूमध्ये असणाऱ्या यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयसीयूमधील यंत्रणांची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी केली जात नसल्याचेही यानिमित्त समोर आले आहे. आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर, एसी आदींबाबतचा निष्काळजीपणा रुग्णांचे जीवित धोक्यात आणू शकतो.हृदयाशी संबंधित विकारांवर सुलभ उपचारासाठी तसेच अत्यवस्थ आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास मिळावा म्हणून आयसीयू विभाग महत्त्वाचा ठरतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कोणताही परिणाम हॉस्पिटलमधील आयसीयू विभागावर होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास आयसीयूमधील सुविधा बंद पडून धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आयसीयूसाठी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था आवश्यक असते. आयसीयूची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था केली जाते. परंतु शॉर्टसर्किटमुळे झालेल्या घटनेनंतर आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर आदी सुविधांबाबत हॉस्पिटलकडून कितपत काळजी घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विविध सुविधा हव्यातआयसीयूमध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, ब्लड गॅस मशीन, पॅथॉलॉजी बॅकअप, एसी, ट्रेन नर्सिंग स्टाफ, हाताने पंपिंग करून रुग्णाला आॅक्सिजन देणारी यंत्रणा, जनरेटर, जंतू संसर्ग होऊ न देणारी यंत्रणा आदी सुविधांची आवश्यकता असते.५० हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधाशहरातील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये आयसीयूची सुविधा आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू स्डँडर्ड नॉर्मनुसार आहे; परंतु काही हॉस्पिटलमधील आयसीयू तसे नसल्याचे मत मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.सुविधा महत्त्वाच्याआयसीयूमध्ये आॅक्सिजनचा पुरवठा, एसी, पोल्युशन फ्री वातावरण आदी महत्त्वाचे ठरते. नवीन व्हेंटिलेटर वीजपुरवठा खंडित झाल्यावरही बंद पडत नसल्याचे डॉ. शेख मुर्तुजा यांनी सांगितले.आयसीयूंची लवकरच तपासणीआयसीयूचे स्टँडर्ड नॉर्म आहेत. या नॉर्मनुसार आयसीयू असायला पाहिजेत. परंतु शहरातील अनेक आयसीयू या नॉर्मनुसार नाहीत. काही आयसीयूबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील आयसीयूंची तपासणी केली जाणार आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी म्हटले.