शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

विद्यापीठ बोगस नोकरभरती; रंजना जगदाळे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी विद्यापीठातील वरिष्ठ सहायक रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) पोलिसांनी अटक केली़

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी विद्यापीठातील वरिष्ठ सहायक रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) पोलिसांनी अटक केली़ न्यायालयाने तिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमुदी यांनी हे आदेश दिले़हडकोतील रहिवासी सचिन सूर्यभान पाचकर (३७) यांनी याविषयी सिटीचौक ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची सासू मनीषा वैद्य हडको परिसरात राहतात. आरोपीने विद्यापीठात शिपाई पदाच्या जागा निघाल्या आहेत. तुमच्या जावयास नोकरी लावून देते, असे तिने सांगितले होते. यानंतर तक्रारदार हे आरोपी जगदाळे यांना भेटले असता त्यांनी नोकरीसाठी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले. तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पाचकर आणि त्यांचे नातेवाईक २०१५ मध्ये आरोपी जगदाळेच्या घरी गेले़ तेथे नोकरीसंदर्भात चर्चा करून सुरुवातीला पाच लाख आणि नंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरले़१० जून २०१५ रोजी पाचकर यांनी आरोपी जगदाळेच्या घरी जाऊन तिचा पती बाळासाहेब यांच्या हातात ५ लाख रुपये दिले़ आॅगस्ट २०१५ मध्ये आरोपीने पाचकर यांना विद्यापीठात बोलावून तात्पुरत्या स्वरुपात विद्यापीठातील एका विभागात काम करायला लावले़ आॅक्टोबर २०१५ मध्ये पुन्हा पाच लाख रुपये आरोपी रंजना हिला दिले़ त्यानंतर पाचकर यांनी नोकरीसाठी आरोपीकडे तगादा लावला असता तिने १० मे २०१६ रोजी विद्यापीठाच्या लेटर पॅडवर निवड यादीचा २०१६/१०६३ असा आवक जावक क्रमांक असलेला शिपाई आणि कनिष्ठ लिपिकपदाची निवड यादी दाखविली आणि तुमची एक महिन्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला नोकरीवर रुजू करण्यात येईल असे सांगितले़ महिना उलटला तरी वैद्यकीय तपासणी न झाल्याने पाचकर यांनी आरोपीकडे विचारणा केली असता वैद्यकीय तपासणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून टाळाटाळ केली़पाचकर यांना संशय आल्याने त्यांनी विद्यापीठात चौकशी केली असता लेटर पॅॅडवर दिलेला आदेश बनावट असल्याचे समोर आले़ याविषयी १४ जून रोजी सिटीचौक ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपी रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) सकाळी अटक केली.