शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे आज होणार जोरदार स्वागत

By admin | Updated: May 29, 2014 00:41 IST

जालना : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे गुरूवारी पहिल्यांदाच जालन्यात दाखल होणार आहेत.

 जालना : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे गुरूवारी पहिल्यांदाच जालन्यात दाखल होणार असून, त्यांचे महायुतीतर्फे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात दानवे यांच्या रूपाने या जिल्ह्यास पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळाल्याने जालनेकरांना मोठा आनंद झाल्याचे खोतकर यांनी म्हटले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने हा जिल्हा भारावलेला आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीतून प्रकर्षाने दिसून आल्याचे नमूद करीत, खोतकर यांनी दानवे यांच्या मंत्रीपदामुळे जिल्हावासियांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या इच्छा-आकांक्षांची निश्चित पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या छोट्याशा मंत्रिमंडळात दानवेंचा समावेश करीत, या जिल्हावासियांना निश्चितपणे न्याय दिला असून, भविष्यातसुद्धा ते या जिल्हावासियांचे सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लावतील, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळात या जिल्ह्यास पहिल्यांदा प्रतिनिधीत्व मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांचे महायुतीतर्फे गुरूवारी जोरदार स्वागत केले जाईल, असे खोतकर यांनी म्हटले. मोतीबागेपासून दानवे यांची दुपारी १ वाजता मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. कचेरी रोड, मंमादेवी, काद्राबाद, सराफा, आर.पी. रोड, सिंधी बाजारमार्गे मिरवणुकीचा मामा चौकात समारोप होणार आहे. त्या ठिकाणी दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, आ. संतोष सांबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. शिवाजीराव चोथे, उपनेते लक्ष्मणराव वडले, रिपाइंचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, किशोर अग्रवाल यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी,विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, असे खोतकर यांनी म्हटले. यावेळी अ‍ॅड. संजीव देशपांडे, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले, बाला परदेशी आदी उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा आपल्या जीवनातील एक आनंदाचा क्षण ठरल्याचे खोतकर यांनी नमूद केले. दानवे कुटुंबियांसह आपण व किशोर अग्रवाल हे या सोहळ्यास उपस्थित होतो, असे ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या स्वागताकरिता महायुतीच्या पुढार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुतेकर यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यातून रूपरेषा ठरविण्यात आली. यास जि.प. अध्यक्षा भुतेकर, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अ‍ॅड. भास्करराव मगरे, अनिरूद्ध खोतकर, पंडितराव भुतेकर, किशोर अग्रवाल, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, मुरलीधर शेजूळ, रावसाहेब राऊत, वीरेंद्र धोका, संतोष मोहिते, सुधाकर वाढेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, माधवराव टकले, सविता किवंडे, गंगूबाई वानखेडे, बजरंग राजपूत, जगन्नाथ चव्हाण, राम सतकर, महेश दुसाने, संताजी वाघमारे, बाबूराव पवार, विजय पवार, अशोक पवार, विजय जाधव, श्याम कदम, सचिन भांदरगे, यादवराव राऊत, बाबूराव खरात, विष्णू चव्हाण, सखाराम भापकर, सिद्धीविनायक मुळे आदी उपस्थित होते.