शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची कारला धडक; तरुणाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST

पाचोड : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ अज्ञात वाहनाने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एका तरुणाचा ...

पाचोड : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्रीजवळ अज्ञात वाहनाने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात भीषण होता की, अज्ञात वाहनाने कारला जवळपास दोनशे फूट अंतरावर फरपटत नेले. अखेर कार दुभाजकावर जाऊन धडकली. शनिवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून शिव पुरुषोत्तम अग्रवाल (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अन्य चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील शिव पुरुषोत्तम अग्रवाल हा शनिवारी पहाटेच आपल्या कॉलेजच्या मित्रांबरोबर बीडमधील गेवराईच्या मित्राला भेटण्यासाठी कार (एम.एच.- २० सी.यू.- ९७८६) गेला होता. मित्राला भेटून झाल्यावर औरंगाबादकडे पुन्हा परतला. महामार्गावरील वडीगोद्रीजवळील पुलावरून जात असताना बीडकडून औरंगाबादकडे सुसाट वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमध्ये पाठीमागे बसलेला शिव पुरुषोत्तम अग्रवाल (१७) हा कारमध्ये दबला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील कामील खान शब्बीरखान (१६), क्षितिश मनीष रणखांब (१६), ओम अग्रवाल (१६) व चालक शेख मंजूर शेख बशीर (५२) (सर्व रा. औरंगाबाद) हे चार जण जखमी झाले.

अपघाताची माहिती पाचोड पोलिसांना आणि पाचोड येथील संजय सेठी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्याचे सपोनि. अतुल येरमे, पोलीस जमादार सुधाकर मोहिते, संजय सेठी, राजेश सेठी, बाळासाहेब बोचरे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे, डॉ. बाबासाहेब घुगे यांनी शिव अग्रवाल यास मयत घोषित केले. जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शिव अग्रवाल याचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सपोनि. अतुल येरमे व पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते करीत आहेत.

--------

मनमिळाऊ स्वभावाचा होता शिव

अपघातात मृत झालेला तरुण शिव अग्रवाल हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. महाविद्यालयीतील हुशार मुलगा म्हणून त्याची ओळख होती. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे, त्यात प्रावीण्य मिळविणे, असा त्याचा स्वभाव होता. शालेय जीवनापासूनच त्याने विविध पुरस्कारावर मोहर लावली होती. सर्वांच्या लाडक्या मित्रांचा दुर्दुैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

------

फोटो - अपघातात चेंदामेंदा झालेली अपघातग्रस्त कार, तर इन्सेटमध्ये मृत शिव अग्रवाल.