शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

भाडे न भरताच बिनदिक्कतपणे पालिका इमारतींचा वापर

By admin | Updated: May 26, 2017 00:40 IST

अंबड : नगरपालिकेच्या मालकीच्या एकुण किती इमारती शहरात आहेत याची ठोस माहिती पालिका प्रशासनाकडेच नाही.

रवी गात । लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरपालिकेच्या मालकीच्या एकुण किती इमारती शहरात आहेत याची ठोस माहिती पालिका प्रशासनाकडेच नाही. पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये दोन बँक व चार शैक्षणिक संस्था आहेत, धक्कादायक बाब म्हणजे यापैकी काहींचा पालिकेशी कोणताही करार झालेला नाही तसेच काही संस्थांनी अनेक वर्षांपासून भाडेच भरलेले नाही तरीही या संस्था पालिकेच्या मालकीच्या इमारती वापरत असल्याचे उघडकीस येत आहे. पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन बँक तसेच कै.दत्ताजी भाले विद्यालय, गोदावरी प्राथमिक विद्यालय, मत्स्योदरी विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय अशा चार शैक्षणिक संस्था आहेत. यापैकी काहींनी भाडे करार केलेला आहे तर काहींनी केवळ भाडेकराराचा फार्स करुन इमारती ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक वातावरण व परिस्थितीच नाही, तरीही याठिकाणी शाळा चालविल्या जात आहेत. विशेष म्हणजे शहरातील युवकांनी विविध क्रीडाप्रकारांकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने पालिकेने तयार केलेल्या क्रीडा संकुलात खाजगी शाळा आहे, या संस्थेचे नाव एका अत्यंत शिस्तबध्द, नीतीमत्ता जपणाऱ्या व तत्वांशी कोणत्याही बाबतीत तडजोड न करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. क्रीडा संकुलात खेळाडुंना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लहान-लहान खोल्यांमध्ये वर्ग भरविणे कोणत्या नीतीमत्तेत बसते. काही वर्षांपासून पालिकेचे भाडे भरणेच बंद केले आहे. पालिकेच्या मालकीच्या या क्रीडागंणाच्या इमारतीमध्ये शाळेने नवीन बांधकाम सुरू केले आहे. या शाळेकडे पालिकेचे तब्बल ५ लाख ५२ हजार रुपये थकीत आहेत. (समाप्त)