शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड कवायत पोलिसांच्या नियंत्रणात

By admin | Updated: May 24, 2016 01:07 IST

शेषराव वायाळ , परतूर होमगार्डसची कवायत आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आली असून, पोलिसांनी मागील पंधरा दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

शेषराव वायाळ , परतूरहोमगार्डसची कवायत आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आली असून, पोलिसांनी मागील पंधरा दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे आता गृहरक्षक दलात अमूलाग्र बदल होत असताना दिसत आहे.गृहरक्षक दलाची कवायत पूर्वी त्यांच्या स्तरावरच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या रविवारी घेतली जायची. आता ही कवायत महाराष्ट्र गृहरक्षक दल मुंबई येथून एका आदेशान्वये पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. यामुळे कवायतीची संख्या वाढत आहे. यातून पोलिस भरतीस लाभ होतो की काय, अशीही भावना होमगार्डसमध्ये निर्माण झाली आहे. परतूर तालुक्यात सध्या १०० होमगार्डसची संख्या तर जिल्ह्यात ५०० च्या वर होमगार्डस कर्तव्यावर आहेत. होमगार्डसना सध्या पोलिस दलात ५ टक्के राखीव जागा देण्यात आल्या आहेत. तसेच कर्तव्यावर असताना ४०० रुपये दररोज दिले जातात. तर कवायतीचा भत्ता १०० रुपये दिला जातो. गृहरक्षक दलाची कवायत पोलिसांच्या नियंत्रणात आल्याने होमगार्डमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. याबरोबरच गृहरक्षक दलात शिस्तही वाढली आहे. एकूणच अहोरात्र कर्तव्य पार पाडून फारसा लाभ मिळत नसलेल्या गृहरक्षक दलातील मरगळ आता दूर होताना दिसत आहे. (वार्ताहर)यासंदर्भात परतूर तालुका प्रभारी समादेशक एस.एल. काकडे म्हणाले की, गृहरक्षक दलाचे काम जिल्हा समादेशक तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या नियंत्रणाखाली प्रभावीपणे सुरू आहे. आमची कवायत पोलिसांकडे गेल्याने एक वेगळी शिस्त निर्माण होऊन होमगार्ड चांगले प्रशिक्षित होतील, असेही तालुका समादेशक काकडे यांनी सांगितले.