शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

उंडणगावातील प्रा. आ. केंद्रात लसीकरणाबाबत सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:05 AM

उंडणगाव : लस दिलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी संगणकच नसल्याने मोबाइलवरच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात ...

उंडणगाव : लस दिलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी संगणकच नसल्याने मोबाइलवरच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात व्हेरिफिकेशन करण्यासाठी तासंतास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.

आरोग्य केंद्रात संगणक अद्ययावत करून नागरिकांच्या नोंदी व्हेरिफिकेशन करण्यासाठी येथे संगणक व इंटरनेट उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी सध्या लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांची ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर त्यांना लस देण्यात येते. त्यानंतर घेतलेल्या लसीच्या डोसचे व्हेरिफिकेशन करण्यात येते. आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे व्हेरिफिकेशन करतात. मात्र सध्या मोबाइलद्वारेच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात संगणक सुरू नाही. तसेच इंटरनेटसेवासुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लस घेतल्यानंतर आधार कार्ड, लसीकरण झालेल्या नागरिकांच्या फोटोचे व्यवस्थित व्हेरिफिकेशन करून त्याच दिवसभराची माहिती ही शासनाला पाठविण्यात येते. सध्या हे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी आपल्या मोबाइलवर करीत आहेत.

आरोग्य केंद्राव्यतिरिक्त नागरिकांची गर्दी

उंडणगाव आरोग्य केंद्राला लस पुरवठा करण्याची मागणी

उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ गावे येतात. या आरोग्य केंद्रा अंतर्गत गावांची लोकसंख्या ही ५४,३४९ आहे. तर त्यात ४५ वर्षे वयोगटातील किमान ३४ हजार नागरिक आहेत. या आरोग्य केंद्रात आतापर्यंत फक्त २,०१५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून सर्वांना लस देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.