शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या उदासिनतेने असुविधांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:57 IST

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़धर्माबाद-मनमाड या मार्गावर परभणी हे रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे़ या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक असलेल्या या रेल्वे स्थानकाचा महसूलही लाखो रुपयांच्या घरात आहे़ मात्र सुविधा देण्यासाठी प्रशासन कासवगतीचा मार्ग अवलंबत आहे़ रेल्वे विभागाच्या आदर्श स्थानकाच्या यादीत परभणीचा नंबर लागला खरा़ परंतु, विकास कामे संथगतीने सुरू आहेत़ रेल्वे प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना सुविधांसाठी ओरड करीत असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही़धर्माबाद ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामातील पहिला टप्पा पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाला़ परभणी ते मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला़ या मार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वे वाहतूक सोयीची होईल, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ पूर्वीपेक्षाही अडचणीत भर पडली आहे़ मागील पाच महिन्यांपासून एकही रेल्वे गाडी परभणी स्थानकावरून वेळेनुसार धावत नाही़ विशेषत: नांदेडकडून मनमाडकडे जाणाºया गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ परभणी रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद, मनमाड, नाशिक आणि मुंबई येथे जाणाºया रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे़विशेष म्हणजे जिल्ह्याची राजकीय मंडळी मुंबईला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे़ परंतु, याच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नांदेडहून मनमाडकडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर लावल्या जात आहेत़परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर (सरकत्या शिड्या) नसल्याने प्रवाशांना दादरा चढून प्लॅटफॉर्म गाठावा लागतो़ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधाच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यातच रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तासापर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या मन:स्तापात भर पडली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे कोचेसची पोझीशन दाखविणारे फलक नाहीत़ तसेच रेल्वे गाड्यांची माहिती देणारे बोर्डही या ठिकाणी नाहीत़ परिणामी आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोचचा अंदाजा घेवूनच प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते़ रेल्वे गाडी आल्यानंतर अनेक वेळा आरक्षणाचा डबा दूर अंतरावर असतो आणि त्यानंतर धावपळ करीत जागा पकडावी लागते़ पाच महिन्यांपासून प्रवाशी या समस्यांना सामोरे जात आहेत़ रेल्वे प्रशासनाने किमान पोझीशन बोर्ड लावले तरी प्रवाशांची सुविधा होवू शकते़ परंतु, प्रशासन मात्र हे साधे कामही करण्यासाठी पुढाकार घेत नाही़रेल्वे दुहेरीकरणानंतर प्रवाशांना या असुविधा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत़ औरंगाबाद-मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना आपली जागा मिळेपर्यंत धाकधूक असते़ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही पुरेशी व्यवस्था केली नाही़ परिणामी चोरीच्या घटना वाढत आहेत़ रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेवून त्वरित सुविधा पुरवाव्यात, प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे़