शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अवैैधरित्या वाळू वाहतूक; सहा वाहनांना ६ लाखांचा दंड

By admin | Updated: May 26, 2017 00:35 IST

कळंब : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडून कळंब महसूल प्रशासनाने वाहनधारकांना तब्बल सहा लाखांचा दंड केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडून कळंब महसूल प्रशासनाने वाहनधारकांना तब्बल सहा लाखांचा दंड केला आहे. गुरूवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.कळंब परिसरातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारी वाहने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळंबचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अशोक नांदलकर, मंडळ अधिकारी अहिरे, देवकर, तलाठी राठोड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यावेळी टिप्पर क्रमांक एमएच-०४/सीसी-५६४८, एमएच-१३/एएस-३५८५, तसेच ट्रक क्रमांक एमएच-०९/क्यू- ७४६४ या वाहनांमध्ये रॉयल्टीपेक्षा चार ब्रास जास्त वाळू वाहतूक केल्यामुळे प्रत्येकी ८१ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. ट्रक क्रमांक एमएच-४२/टी-१०९७ या दोन वाहनांमध्ये रॉयल्टीपेक्षा पाच ब्रास जास्त वाळू वाहतूक केल्यामुळे प्रत्येकी १ लाख ४२ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला. टिप्पर क्रमांक एमएच-१३/एएक्स- ४६३९ यामध्ये सात ब्रास जास्त वाळू आढळून आल्याने १ लाख ४२ हजार ८०० रुपये दंड करण्यात आला. या कार्यवाहीत महसूल प्रशासनाने एकूण ५ लाख ९१ हजार ६०० रुपये असा मोठा दंड ठोठावल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.मागील चार महिन्यात कळंब महसूल प्रशासनाने १३ लाख रुपयांचा दंड या वाळूमाफियांना केला होता. या महिन्यात तब्बल ७ लाख रुपयांचा दंड केल्याने वाळू तस्करीविरुद्ध ही सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. आगामी काळातही नियमबाह्य वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ही धडक कार्यवाही चालूच राहणार असल्ळाचे महसूल प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.