शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

अधिकाऱ्यांचा घरांवर अनधिकृत ताबा!

By admin | Updated: December 9, 2015 00:41 IST

हणमंत गायकवाड, लातूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय वसाहतीतील घरांमध्ये बदलून गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दोन-अडीच वर्षांपासून ताबा आहे़

हणमंत गायकवाड, लातूरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय वसाहतीतील घरांमध्ये बदलून गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दोन-अडीच वर्षांपासून ताबा आहे़ जिल्हाधिकाऱ्यांचे मंजुरी आदेश नसतानाही अशा ९८ घरांमध्ये त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची घुसखोरी आहे़ औसा रोडवरील संक्रमण निवासस्थानात २७ आणि बार्शी रोडवरील वसाहतीत ७१ घरांत या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अनधिकृत वास्तव्य आहे़ परिणामी, नव्याने लातुरात रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान मिळणे जिकरीचे झाले आहे़ राज्यशासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान वाटप करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने या समितीमार्फत अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान राहण्यासाठी दिले जाते़ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली लातूर शहरातील औसा रोडवर एकत्रित संक्रमण निवासस्थानात ५७ आणि बार्शी रोडवर ४३० घरांची शासकीय वसाहत आहे़ या दोन्ही वसाहतीत लातूर शहरातून बदलून गेलेल्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अनाधिकृत ताबा आहे़ संक्रमण निवासस्थानात २७ आणि बार्शी रोडवरील वसाहतीत ७१ घरांवर हा ताबा आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या चार पथकाने या निवासस्थानांची तपासणी केली असता, ही बाब निदर्शनास आली आहे़ अनधिकृत ताबा असलेल्या घरांमध्ये वर्ग १ चे पाच अधिकारी आहेत़ वर्ग २ चे १७ अधिकारी असून, कारकून प्रवर्गातील ३४ आणि शिपाई पदावर असलेल्या ४६ कर्मचाऱ्यांचे या घरांत अनधिकृत वास्तव्य आहे़ लातूरच्या शासकीय निवासस्थानात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेले अधिकारी-कर्मचारी उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, निलंगा, उदगीर, अहमदपूर अशा ठिकाणी बदलून गेले आहेत़ तरीपण त्यांचा या घरांवर अनधिकृत ताबा आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा ताबा असावा, असा संशय घर वाटप समितीला आहे़ त्यामुळे या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध आपल्या स्तरावर चौकशी करण्याचे आदेश आहेत़ संबंधीतांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कारवाई करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत़ समितीची मंजुरी न घेता या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून घरभाडे शासन जमा होते किंवा नाही याबाबतही संशय आहे़ सार्वजनिक विभागाकडून घरभाड्याबाबत खातरजमा होत असल्याचे घर वाटप समितीला वाटत आहे़ यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना व्यक्तीश: जबाबदार धरुन आर्थिक नुकसानीबाबत दंडात्मक कारवाई करण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे़बदलून गेलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वर्षांनुवर्षे शासकीय निवासस्थानांमध्ये ताबा आहे़ त्यांच्याकडून खाजगी दराने भाडे वसुलीची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ ९८ निवासस्थानांत असा ताबा आहे़ त्यावर कारवाई होईल, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ वर्षांनुवर्षे अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घराचा ताबा कोणी दिला, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना पडला असून, ज्यांच्याकडे ताबा देण्याची जबाबदारी आहे़ त्यांनी या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याबाबत कारवाई का केली नाही, असाही प्रश्न पडला आहे़ पथकाने केलेल्या घर तपासणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला असतानाही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़