उमरगा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्र बारदान्याअभावी बंद पडले आहे. त्यामुळे हजारो क्विंटल तुरीची पोती केंद्राच्या परिसरात पडून आहेत. तूर खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.गत वर्षी समाधानकारक पाऊस झाला. खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या. ३५ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. वेळेवर पडलेल्या पावसामुळे तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. हीच संधी साधत खाजगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी केली जात होती. हा प्रश्न लक्षात घेवून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभूत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. केंद्राकडून ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल देण्यात येत असल्याने तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. १५ दिवसांत केंद्रामार्फत ३० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. दिवसागणिक तुरीची आवक वाढत असतानाच बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे तूर खरेदी ठप्प झाली. परिणामी बाजार समितीतील २६ आडत दुकानांपैकी चालू असलेल्या २२ आडत दुकानांच्या परिसरात हजारो क्विंटल तुरीची
उमरग्यात बारदान्याचा तुटवडा
By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST