शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी एकबोटे, भिडे यांना पाठीशी घालू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:35 IST

कोरेगाव भीमा प्रकरण अचानक घडलेले नाही, तर सरकारच्या माध्यमातून मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट रचून घडवून आणलेले आहे. अशा लोकांना छत्रपती उदयनराजे यांनी पाठीशी घालून नवीन वाद निर्माण करू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडने प्र्रसिद्धी पत्रकातून केले आले.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे आवाहन : पदाचा दुरूपयोग नको

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोरेगाव भीमा प्रकरण अचानक घडलेले नाही, तर सरकारच्या माध्यमातून मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट रचून घडवून आणलेले आहे. अशा लोकांना छत्रपती उदयनराजे यांनी पाठीशी घालून नवीन वाद निर्माण करू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडने प्र्रसिद्धी पत्रकातून केले आले.कोरेगाव भीमा प्रकरणामागे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे हिंदुत्ववादी नेते असल्याचा आरोप अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. याप्रकरणी विविध ठिकाणी भिडे आणि एकबोटेविरूद्ध गुन्हे नोंद झाले. असे असताना उदयनराजे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, उदयनराजे हे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो, परंतु त्यांनी छत्रपतीच्या पदाचा दुरुपयोग करू नये, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. कोरेगाव भीमा येथे २०० वर्षांपासून जाणाºया दलित बांधवांचे मराठा बांधव आदरातिथ्य करीत होते. तेथील इतिहासाबद्दल खोटे सांगण्याचे काम भिडे आणि एकबोटे करीत आहेत, यामुळे जातीय दुरावा निर्माण झाला. भिडे आणि एकबोटे यांनी वढू बु., कोरेगाव भीमा आणि परिसरातील गावांमध्ये गैरसमज निर्माण केला. असे असताना छत्रपतींच्या पदावरील व्यक्तीने त्यांना पाठीशी घातल्यामुळे विघातक प्रवृत्तीचे धाडस वाढते. भिडेंनी आजपर्यंत बहुजन तरुणांची डोकी भडकावून दंगली घडवून आणल्या, यामुळे त्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपतींनी सातारा सोडून वढू बु., कोरेगाव भीमात फिरून गैरसमज दूर करावा, आम्हीही तुमच्या सोबत येतो, असे म्हटले आले.