शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

‘उचलेगिरी’ अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. पोलिसांसमोर बड्या कर थकबाकीदारांना उभे करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता स्थावर ऐवजी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केला आहे. मनपाच्या ‘घरगुती उचलेगिरी’ ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याप्रकरणी पालिकेत एका बैठकीत अशा पद्धतीने कर वसुलीचा विचारही प्रशासनाने डोक्यात आणू नये, असा सल्ला प्रशासनाला दिला. मनपाची कर वसुली अडचणीत आली आहे. उपाययोजनेऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.घरगुती मालमत्ताधारकांनी सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे. ४२९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही. ४चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार आहे. ४महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. 1१ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी गेल्या १० वर्षांत करापोटी एक रुपयाही मनपात भरला नाही. अशा घरगुती थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा विचार पालिकेच्या डोक्यात आला कुठून, असा प्रश्न आहे. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे.2मनपा अधिनियमात कर वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद ही सभागृहाच्या मान्यतेनुसार होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने कर वसुली करणे योग्य नसल्याचे मत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले.