शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

भारतातील बहुतांश संशोधनांमध्ये कॉपी पेस्टचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:30 IST

आम्ही ब-याच गोष्टी शेजा-याकडे आहेत म्हणून घेत असतो. स्वत:चे काहीही नसते. याचप्रमाणे भारतातील जास्तीत जास्त संशोधन हे कॉपी पेस्ट असल्याचे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आम्ही ब-याच गोष्टी शेजा-याकडे आहेत म्हणून घेत असतो. स्वत:चे काहीही नसते. याचप्रमाणे भारतातील जास्तीत जास्त संशोधन हे कॉपी पेस्ट असल्याचे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आविष्कार महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे होते. मंचावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, समन्वयक डॉ. भारती गवळी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. काळे म्हणाले, जगभरात भारताकडे बाजारपेठ म्हणूनच पाहिले जाते. येथे खाणारी तोंडे अधिक आहेत. याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र आपण भारतीय सगळ्या गोष्टी बसून पाहत आहोत. आम्ही वाचन विसरल्यामुळे कॉपी पेस्ट संशोधन केले जाते. सर्वाधिक लक्ष हे वाचनाकडे असणे गरजेचे आहे; पण सगळा देशच गळतोय, तर ठिगळ तरी कुठे कुठे लावणार, असा प्रश्न निर्माण झालाय. लोकांना ज्ञान नको आहे. हौदच गळतो, तर भरायचा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित झाल्याचे परखड मतही डॉ. काळे यांनी व्यक्त केले. आपल्या भारत देशाला चांगले शिक्षक, वैज्ञानिक आणि शेतकरी हवे आहेत. परदेशात जेव्हा विद्यार्थी एम.एस्सी. होतात तेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणण्यास पात्र ठरता, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. वाल्मीक सरवदे यांनी केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. भास्कर साठे यांनी करून दिला. अहवाल वाचन डॉ. भगवान साखळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. आभार समन्वयक डॉ. भारती गवळी यांनी मानले.विजेते संशोधक विद्यार्थीविद्यापीठाच्या आविष्कार महोत्सवात कृषी, पशुसंवर्धनमध्ये पदवी गटात प्रथम योगेश गावंडे, द्वितीय स्वप्नील झांबड, पदव्युत्तर गटात प्रथम वैभव माळवदे, द्वितीय कृष्णा सोनवणे, पीएच.डी. गटात प्रथम गणेश बिराजदार आणि प्राध्यापक गटात प्रथम संदीप देशमुख यांनी क्रमांक मिळविले.च्वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधिमध्ये पदवी गटात आकांशा तिवारी प्रथम, तर द्वितीय क्रमांक लोकेश कंसाळ यांनी पटकावला. पदव्युत्तर गटात प्रथम राहुल जाधव, द्वितीय अनघा पेडगावकर, पीएच.डी. गटात प्रथम सिद्धार्थ दाभाडे, द्वितीय यशोदीप पाटील आणि प्राध्यापक गटात प्रथम मनोजकुमार लंगोटे, द्वितीय क्रमांक प्रतिभा गिरबने यांनी मिळवला.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानमध्ये पदवी गटात प्रतीक कुलकर्णी प्रथम, द्वितीय श्रेयश लंकेपिल्लेवार, पदव्युत्तर गटात प्रथम सुनीता सुंदरडे आणि मोनिका माळी द्वितीय, पीएच.डी. गटात प्रथम गजानन बोडखे, द्वितीय सुमेध तालेवार आणि प्राध्यापक गटात प्रथम क्रमांक अनिता निकाळजे यांनी मिळवला.च्विज्ञानमध्ये पदवी गटात प्रथम अजित वावरे, द्वितीय आशिष केकाण, पदव्युत्तर गटात समृद्धी जोशी प्रथम, द्वितीय तेजस्विनी मुंढे, पीएच.डी. गटात प्रथम बालाजी मुळीक, द्वितीय मनीषा अमळेकर आणि प्राध्यापक गटात प्रथम हर्षल पाटील, द्वितीय प्रवीण भाले यांनी क्रमांक पटकावला.वैद्यकीय आणि औषधनिर्माणमध्ये पदवी गटात माधुरी दगडे, द्वितीय दिशा कपूर, पदव्युत्तर गटात प्रथम देवेश कुलकर्णी, द्वितीय अभिजित जोशी, पीएच.डी. गटात प्रथम तेजश्री देशमुख, द्वितीय महेश साळुंके, प्राध्यापक गटात प्रथम अश्विनी बिरादार, द्वितीय खान दुरेश्हवार यांनी बक्षीस पटकावले.च् सामाजिकशास्त्रे, भाषा आणि कला विषयांमध्ये पदवी गटात प्रथम ऐश्वर्या खांडबाहले, द्वितीय स्नेहा अशोक, पदव्युत्तर गटात प्रथम आश्विनी शहाणे, द्वितीय संकेत कुरलकर, पीएच.डी. गटात प्रथम प्रदीप जगन्नाथराव, द्वितीय शीतल गंगावणे आणि प्राध्यापक गटात प्रथम प्रणिता चिटणीस आणि द्वितीय क्र मांक कृष्णा आगे यांनी पटकावला.