परसराम व मधुकर हे दुचाकीने (एम.एच.- २८, व्ही.- ५०९८) औरंगाबादहून सिल्लोडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच आळंद व नायगव्हाण येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आळंदच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे संबंधितांना पुढील उपचारासाठी फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मधुकर बुरंगे यास तपासून मयत घोषित केले. जखमी परसराम यास पुढील उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहे.
--- कॅप्शन : आळंद भागात झालेल्या अपघात दुचाकीची झालेली दुरवस्था.
- मयत मधुकर बुरंगे.