शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST

वाळूज महानगर : अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल रात्री वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली.

वाळूज महानगर : अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल रात्री वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पाटोदा येथील गणेश पुंडलिक भोकरे (३४) हे काल १२ मे रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास गजानंद भुजंगराव काकडे यांना सोबत घेऊन दुचाकी क्रमांक एमएच-२०, सीटी-३३४१ वर स्वार होऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रातून पाटोद्याकडे जाण्यासाठी निघाले होते. कामगार चौकातून वळण घेत असताना औरंगाबादकडून अहमदनगरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात ट्रकने गणेश भोकरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन गणेश भोकरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेले गजानंद काकडे हे जखमी झाले होते. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी गजानंद काकडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार सागरसिंग राजपूत करीत आहेत. तीन अपघातांत चौघांचा बळी गेल्या तीन दिवसांपासून वाळूज परिसरात अपघात सत्र सुरूच आहे. या अपघातात चार जणांचा बळी गेला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ११ मे रोजी मुंबई- नागपूर हायवेवर खोजेवाडी शिवारात बीअर घेऊन जाणार्‍या ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे किशोर जाधव व आकाश जाधव (रा. नागरे बाभूळगाव, ता. गंगापूर) या दोघा पिता-पुत्रांचा मृत्यू झाला होता, तर संगीता जाधव व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. याच महामार्गावर १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिर्डीहून लग्नसोहळा उरकून औरंगाबादकडे येणारी कार टेम्पोवर पाठीमागून धडकली होती. या अपघातात पवन राठी हा ठार झाला असून कारमधील प्रा. नंदकिशोर राठी, गीता राठी, कमल खटोड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. गत तीन दिवसांत विविध अपघातांत ४ जणांचा बळी गेला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.