शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर टक्कर, एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

गल्लेबोरगाव : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळ‌सवाडी गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर ...

गल्लेबोरगाव : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळ‌सवाडी गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रोहित विष्णू यादव (१९, रा. सागर, मध्य प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमीचे नाव रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

रोहित विष्णू यादव हा औरंगाबादहून कन्नडकडे दुचाकीने (क्र. सीजी ०४ सीटी १८५१) जात होता. त्यावेळी कन्नडवरून औरंगाबादकडे येणाऱ्या दुचाकीची (क्र. एमएच १८ बीई २४७४) पळसवाडी गावाजवळ समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात मध्य प्रदेश येथील पण सध्या औरंगाबादेत राहणारा रोहित यादव जागीच ठार झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाला. घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेतून दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे उपचारासाठी पाठविले. वेरूळ येथील डॉक्टरांनी तपासून एकास मृत घोषित केले. तर जखमीला घाटीत पुढील उपचारासाठी पाठविले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व खुलताबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात ठार झालेल्या युवकाला औरंगाबादेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-------------

एकेरी वाहतूकीचा ठरला बळी

धुळे सोलापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने सध्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग आहे. वाहतुकीचा दिवसेंदिवस खोळंबा होत असून, अपघात सत्र थांबता थांबेना झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पळसवाडीच्या दोनशे मीटर अंतरावर हा तिसरा अपघात आहे. त्यामुळे मृत्यूचा तांडव कधी थांबणार, असा प्रश्न पळसवाडी गावकरी करीत आहेत.

-----

फोटो :