शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दोन गावांची भागविली तहान

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

भास्कर लांडे, हिंगोली पिण्याच्या पाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असताना पाणी मिळत नव्हते. जमिनीची चाळणी केली तरी गावाला पुरेल एवढे पाणी लागत नव्हते.

भास्कर लांडे, हिंगोलीपिण्याच्या पाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची तयारी असताना पाणी मिळत नव्हते. जमिनीची चाळणी केली तरी गावाला पुरेल एवढे पाणी लागत नव्हते. कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या सरकारी योजना अपयशी ठरत गेल्या. अधिग्रहणाच्या रडबोंबीने ग्रामस्थांची तहान भागत नव्हती. शहराबाहेर गाव असल्यामुळे जलवाहिनीचा प्रश्नच नव्हता. परिणामी शेतकऱ्यांना औताऐवजी बैल पाण्याच्या टाकीला जुंपावे लागले होते. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरत नव्हता. पाण्यासाठी दाहीदिशा एक करणाऱ्या ग्रामस्थांना सय्यद शामद सय्यद फतरू यांनी दिलेल्या विहिरीच्या पाण्यामुळे पिंपळखुटावासियांच्या घरोघरी नळ वाहू लागले. त्यासाठी कारवाडीतून ३ किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकल्यामुळे सकाळी ३ आणि सांयकाळी ३ तास कडक उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळू लागले. दुसरीकडे कारवाडीवासियांनादेखील पाणी दिल्यामुळे दोन्ही गावांतील ३३० घरात आज गंगा अवतरली आहे. हिंगोली शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर कारवाडी हे गाव आहे. नगर पालिकेची हद्द तिथपर्यंत गेली नसल्याने गाव नागरी योजनांशी जोडले नाही. प्रत्यक्षात शहरी वस्ती होत गेल्याने आगामी काही वर्षांतच नकाशातून हे गाव गायब होण्याची शक्यता आहे. शहराच्या पायथ्याला लागून असतानाही गाव विकासापासून कोसोमैल दूर राहिले. शहरात असलेली जलवाहिनी योजना कारवाडीत पोहोचली नसल्यामुळे गावात पाण्याचे संकट निर्माण झाले. कारवाडीपासून ३ किलोमीटर अंतरावरील पिंपळखुटा गावात पाणीटंचाईची तीव्रत्ता अधिकच होती. कारण गावात पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत नव्हता. शासकीय योजना अपयशी झाल्यामुळे पाणी मिळत नव्हते. घराघरात बोअर घेण्याची प्रत्येकाची ऐपत नव्हती. टंचाईपायी पाहुण्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी देताना ग्रामस्थ हात आखडत होते. परिणामी अगदी सकाळपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा एक कराव्या लागत होत्या. काही ग्रामस्थ कारवाडीतील सय्यद शामद यांच्या विहिरीवरून पाणी आणीत होते. रोडलगतच विहीर असल्यामुळे येथून पाणी नेणाऱ्यांची संख्या वाढली. दरम्यान काही ग्रामस्थांना सय्यद शामद यांच्या विहिरीतून पिंपळखुटा येथे पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याची कल्पना सुचली. तातडीने सय्यद शामद यांची भेट घेवून पाईपलाईनसाठी विनवणी केली. ग्रामस्थांच्या हालापेष्ठा पाहून शामद यांनी तीन वर्षांसाठी पाणी देण्याचे सुतोवाच केले. पिंपळखुटा ग्रामस्थांनी तातडीने लोकवर्गणी जमवून पाईपलाईन टाकली. पाईपलाईनसाठीचे दिव्य पार केल्यानंतर मोटारीचे बटन दाबताच नळांमार्फत घराघरांत पाणी येवू लागले. पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना मूबलक पाणी मिळाले. घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या ग्रामस्थांना मागील दोन्ही उन्हाळ्यात पाण्याचा स्त्रोत मिळाला. आजघडीला सकाळी ३ आणि सायंकाळी ३ तास पिंपळखुटावासियांसाठी पाणी सोडले जाते. म्हणून सलग दोन उन्हाळ्यापासून २६० घरांची तहान भागली. उन्हाळा लोटत असताना पिंपळखुटा येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसली नाही. अधिग्रहण आणि शासकीय योजनांची मदत न घेता केलेल्या या करारामुळे ग्रामस्थांचे भले झाले. आठवड्यापूर्वी २ गावांना पाणी देवून कापसाच्या दोन बॅगांना पाणी पुरत होते; पण पाऊस गायब झाले आणि वाऱ्याचा वेग वाढला. परिणामी दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत आहे. त्यासाठी अन्य एका बोअरचे पाणी विहिरीत टाकावे लागले; परंतु पंधरा दिवसानंतर चिंता वाढणार आहे. - सय्यद शामद सय्यद फतरू, शेतकरी, कारवाडी.कारवाडी ग्रामस्थांना मिळाले पाणीशहरात नोकरीस असलेल्या पण कारवाडीत राणाऱ्या ७० घरांनी सय्यद शामद यांच्या विहिरीतून पाणी घेतले. पिंपळखुटाप्रमाणे कारवाडीत पाईपलाईनद्वारे बहुतांश जणांच्या घरांना पाणी आले. शहरातील योजनेचे पाणी मिळत नसताना सय्यद शामद यांनी कारवाडी ग्रामस्थांची हालापेष्टा थांबविली. कोणतीही योजना नसताना पाण्याच्या बाबतीत कारवाडीवासिय निवांत झाले. तिन्ही ऋतूमध्ये ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळाले. म्हणून कोणत्याही योजनेची गरज नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना मिळाले मुबलक पाणी. आजघडीला सकाळी ३ आणि सायंकाळी ३ तास पिंपळखुटावासियांसाठी सोडले जाते पाणी. सलग दोन उन्हाळ्यापासून २६० घरांची तहान भागली. तसेच उन्हाळा लोटत असताना पिंपळखुटा येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईची बसली नाही झळ.