येरमाळा : येरमाळा पोलिसांनी वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारातील एका वस्तीवर कारवाई करून एक ट्रक, दोन दुचाकींसह १२०० लिटर डिझेल जप्त केले़ ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली़ तर दोन इसमांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारातील एका वस्तीवर काही वाहने संशयितरित्या उभा असल्याची माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून सपोनि विनोद चव्हाण, पोउपनि जिरगे, पोउपनि वाघमोडे, बाळासाहेब खोत, किरण औताडे, राकेश पवार, करीम शेख, संगिता चव्हाण, प्रांजली साठे, राजेश साळुंके यांच्या पथकाने शनिवारी सकाळी खामकरवाडी शिवारातील वस्तीवर कारवाई केली़ या कारवाईत सहा लाख रूपये किंमतीचा एक ट्रक, ४० हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी व ७७ हजार रूपयांचे १२०० लिटर डिझेल जप्त केले़ तर दोन संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे़ तपास सपोनि विनोद चव्हाण हे करीत आहेत़
ट्रकसह दोन दुचाकी जप्त
By admin | Updated: April 2, 2017 00:14 IST