शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बसविणार दोन रणगाडे

By admin | Updated: July 15, 2015 00:47 IST

औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत

औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत. लष्कराने मनपाला हे रणगाडे देण्याचे मान्य केले असून, ते बसविण्याच्या जागा निश्चित कराव्यात असे म्हटले आहे. जागा निश्चित होताच लष्कराकडून त्याठिकाणी हे रणगाडे आणून बसविले जाणार आहेत.शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने काही महानगरांमध्ये तेथील चौकात लष्कराचे खरेखुरे रणगाडे ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे नागरिकांना आणि विशेषत: लहान मुलांना लष्कराच्या शस्त्रांविषयीची माहितीही मिळते. म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी रणगाडे मिळावेत म्हणून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली जात होती.या पार्श्वभूमीवर अखेर सोमवारी औरंगाबाद लष्कर तळाचे प्रमुख मनोजकुमार यांनी मनपाला दोन रणगाडे देण्याचे मान्य केले. हे रणगाडे बसविण्यासाठी मनपाने जागा निश्चित कराव्यात, या जागा निश्चित होताच दोन्ही रणगाडे तेथे बसविले जातील, असेही पत्रात म्हटले आहे. लष्कर तळाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कमांडन्ट कर्नल ए. पी. सिंग यांच्या स्वाक्षरीने मनपाला हे पत्र देण्यात आले आहे. मनपातील अधिकाऱ्यांनी दोन्ही रणगाडे बसविण्यासाठी जागांचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार एक रणगाडा हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानात आणि दुसरा एका महत्त्वाच्या चौकात बसविण्यावर विचार केला जात आहे. १रणगाड्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असली तरी विविध चौकांतील वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. २महापौर त्र्यंबक तुपे यांनी खाजगी उद्योजक आणि इतर व्यक्तींच्या मदतीने शहरातील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करून घेण्याचा विचार मांडला होता. त्यासाठी त्यांनी उद्योजक आणि इतर व्यक्तींना तसे आवाहन केले होते. ३या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी शहरातील १० चौकांतील वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शवीत तसे प्रस्ताव दाखल केले; परंतु हे प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे मंजुरीसाठी तसेच पडून आहेत.