शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

दोन चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त

By admin | Updated: July 7, 2015 00:55 IST

औरंगाबाद : विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दिनेश जाधव (रा. खामगाव, ता.नेवासा, जि.अहमदनगर) आणि दीपक वाघ (रा.फुलंब्री) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक हाशमी यांनी सांगितले की, हे दोघे चोरीच्या मोटारसायकली ग्रामीण भागात विक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार यांना मिळाली. त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी दिनेशला नेवासा तालुक्यातून अटक केली. त्यानंतर दीपक यास फुलंब्री येथे पकडण्यात आले. या दोघांनी औरंगाबाद, पुणे आणि अन्य शहरांतही वाहनचोऱ्या केल्याचे समोर आले. मुकुंदवाडी, सिडको ठाण्याच्या हद्दीतून त्यांनी प्रत्येकी एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. हर्सूल ठाण्याच्या हद्दीतून त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्या होत्या. पोलीस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आठ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या गाड्या त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना अत्यल्प किमतीत विक्री केल्या होत्या. शेतकऱ्यांकडून या गाड्या जप्त करण्यात आल्याचे निरीक्षक हाश्मी यांनी सांगितले. आरोपींकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.