शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटणारे दोन भोंदू अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या दिवशी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना पाहून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या दोन भोंदूबाबांना गुन्हे शाखेच्या पथकाने ...

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या दिवशी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना पाहून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या दोन भोंदूबाबांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. या दोघांची झाडाझडती घेतली असता, दोन ठिकाणी केलेल्या चोरीचा मुद्देमालही त्यांच्याकडे सापडला. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुकुंदवाडी भागातील ज्ञानेश्वर कॉलनी येथे एका महिलेला भविष्य सांगण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाचे धोतर, भगव्या रंगाचा शर्ट आणि डोक्याला पिवळा फेटा बांधलेल्या व्यक्ती घरात शिरला. भविष्य सांगण्यासाठी साहित्य ठेवलेले असताना त्याने गुंगीचे औषध मिसळलेला पदार्थ टाकून महिलेला वास घेण्यास लावले. वास घेतल्यानंतर महिलेला गुंगी आली. हा डाव साधत भोंदूने ३२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (दि.२२) भवानीनगर येथील गल्ली नंबर ६ मध्ये एकटी राहत असलेल्या महिलेला दोन भोंदूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त साखर खाण्यास मागितली. जेव्हा महिलेने साखर खाण्यास दिली असता, महिलेलाच साखर खायला लावून हातावर भंडारा टाकून भोवळ आणली. यानंतर महिलेच्या घरातील ८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन घटनांमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित व्यक्ती श्रीकृष्णनगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी गुन्हे शाखेने सापळा लावून योगेश खंडू सोळंके (२७, मुळ गाव कोथळज, जि. हिंगोली, ह.मु.हिवरा फाटा, करमाड) आणि विश्वनाथ नारायण शिंदे (३२, मूळगाव बोरगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम, ह.मु. हिवरा फाटा, करमाड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन्ही गुन्ह्याच्या संदर्भात विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल देशमुख, अंमलदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

चौकट,

हा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन भोंदूबाबाकडून ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये रोख, फेटा, कवड्याची माळ, भंडाराची कातडी पिशवी, खंजीर वाद्य, गणपतीची मूर्ती, खंडोबाची मूर्ती, तांदुळ, खोबरा वाटी, हळद, राशीचे खडे, रुद्राक्ष, आधारकार्ड, मनगटी घड्याळाचा समावेश आहे.

चौकट,

दोन दिवसांची पोलीस कोठडी

गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. हे आरोपी एकट्या महिलांना पाहून हेराफेरी करीत त्यांच्याकडील ऐवज लंपास करीत होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच शहरात आलेले असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.