शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिल्ह्यात दोन रस्त्याची दुरवस्था... ‘परिवहन’ला ७२ कोटींचा महसूल

By admin | Updated: January 9, 2015 00:51 IST

लातूर : लातूर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वर्षाकाठी विविध कारवायातून मिळणाऱ्या महसूलाबाबत ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़

लातूर : लातूर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वर्षाकाठी विविध कारवायातून मिळणाऱ्या महसूलाबाबत ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी ७२ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल मिळविला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डी़टी़ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़यावेळी बोलताना पवार म्हणाले, यावर्षी १०२ कोटीच्या महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ तेही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे मतही त्यांनी व्यक्त केले़ तसेच दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ११ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे़ यामध्ये शहरातील मुख्य चौकामध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात बॅनर्स, पोस्टर्स लावणे, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड, अनुज्ञाप्ती रद्द, ड्रंकन ड्राईव्ह/ ओव्हरस्पिड तसेच वाहनांच्या काचावर काळे फिल्म बसविलेल्या वाहनावर कारवाई करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे़या सप्ताहाचा प्रारंभ १२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे़ या सप्ताहमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, एड्स जनजागृती कार्यक्रम, रस्ता सुरक्षा अभियानाविषयी चित्रफित प्रदर्शित करणे, मुख्याध्यापकाची कार्यशाळा, विद्यालयीन विद्यार्थ्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत व २६ जानेवारी रोजी लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डी़टी़ पवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असले तरी रस्त्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पाठपुरावा करुन लातूर, अहमदपूर व औसा, लातूर, अहमदपूर या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पाठपुरावा केला आहे़ तरीही त्याची दुरुस्ती झाली नाही़ या राष्ट्रीय मार्गाची दुरावस्था असतानाही रस्ता सुरक्षा अभियान घ्यावे लागत आहे़ यापुढील कालावधीतही रस्ता सुरक्षेविषयी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करु असेही मत त्यांनी व्यक्त केले़