शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे डोस पूर्ण केल्यानंतर दोन जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित दोन्ही रुग्णांच्या लाळेचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

शहरात कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. मंगळवारी शहरात २८३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजनाही सुरू आहेत.

१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो.

शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

१५ दिवसांनी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात

कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शहरात दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. मात्र, शंका आल्यामुळे दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात. लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.