पाचोड : पाचोड ठाण्याचे पोलीस कर्मचारी गुरुवारी कोळीबोडखा येथे आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले असता पोलिसाला गावातील दोन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्या दोन जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार हनुमान नरहरी धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धनवे व घुले हे गुरुवारी कोळीबोडखा येथे गु.र.नं. १६६/२०१४ कलम ३२४ भा. दं. वि. मधील आरोपी लहू मगरे याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी बोलावून आणण्यासाठी गेले असता लहू मगरे यास पोलीस स्टेशनला येण्याबाबत तोंडी समज देत असताना राजू हातागळे, गोंडीराम हातागळे या दोघांनी धनवे यांना शिवीगाळ करीत शर्टचे बटन तोडले. यावेळी पोलीस नाईक घुले हे मध्यस्थी करत असताना त्यांनाही मारहाण केली. या झटापटीत गोटीराम हातागळे हा पळून गेला व राजू हातागळे यास ताब्यात घेतले. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी या दोन जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोडच्या दोन पोलिसांना मारहाण
By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST