\गंगापूर : औरंगाबाद- अहमदनगर मार्गावरील एका ढाब्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण ठार, तर तिघे जखमी झाले. बुधवारी (दि़३०) दुपारी १२ वाजता हा अपघात झाला़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे.अहमदनगरकडून औरंगाबादकडे येत असलेल्या चालकाने कंटेनर (क्र. एमएच-४६ ए-८६२) भरधाव वेगात चालविल्याने त्याचा ताबा सुटला़ यामुळे हे कंटेनर अहमदनगरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार (क्र ़ एमएच-१५ सीएच-९९०९) आणि दुचाकीला (क्ऱ एमएच-२० सीएक्स-७२३५)जाऊन धडकले़ या धडकेत किरण अण्णासाहेब मेटे (२२) रा़ केरवडी, ता. पाथर्डी, जालिंदर आसाराम म्हस्के (४०) रा़ सावरगाव, ता. आष्टी, जि. बीड हे दोघे ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच गंगापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बर्डे, पो.नि. विजयकुमार सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातप्रकरणी कंटेनरचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याने मद्य प्रशान केल्याचे आढळून आले़ सुभाष शिवाजी पुरी, रा़ पुंगळा, ता. जिंतूर यांच्या फिर्यादीवरून सदाशिव बाळू जाधव, रा़ वळूज वाकेश्वर, ता. खटाव, जि. सातारा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.उ.नि. पंडित सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
तिहेरी अपघातात दोन जण ठार
By admin | Updated: December 31, 2015 00:56 IST