शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील २ तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:37 IST

दुचाकीने घरी परताना पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकीस दिलेल्या जबर धडकेत दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर लाडगाव उड्डाण पुलाजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककरमाड : दुचाकीने घरी परताना पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या चारचाकीने दुचाकीस दिलेल्या जबर धडकेत दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर लाडगाव उड्डाण पुलाजवळ घडली.अमरुल्लाह गुलमोहंमद खान (२०, रा. कनवरगाव, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), कृष्णकुंज कुमार (२०, रा. पिपराकानुनगो, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, ह.मु. शंभूनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद) असे दुचाकीवरील मयत झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर या चारचाकी इंडिगो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीलाही (क्र. एमएच २१ जे ३०९०) जोराची धडक देत तिचे मोठे नुकसान करीत दुभाजकावर जाऊन धडकली.याबाबत अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी दुचाकीचे मालक संदीप शेजवळ (रा. कुंभेफळ ,ता. जि. औरंगाबाद) यांनी या अपघाताबाबत शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. या अपघाताबाबत करमाड पोलिसांनी घाटीतील नोंद घेत फिर्यादीच्या तक्रारीवरून इंडिगो कार (क्र. एमएच २० सीएस ७११३) या गाडीचा चालक चिमणीलाल पेंढारकर (रा. संजयनगर, औरंगाबाद) याच्याविरुद्ध वाहन भरधाव वेगाने चालवून दुस-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.अपघाताबाबत करमाड पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील दोन्ही तरुण पीओपीचे काम करणारे मजूर होते. दोघांचेही गाव उत्तर प्रदेशमध्ये अगदी जवळ जवळ असलेले हे तरुण कामाच्या शोधात मागील काही वर्षांपासून औरंगाबाद येथे शेजारी शेजारी राहतात. दरम्यान, सर्वत्र धूलिवंदन साजरा करीत असताना आज सुटी आहे, तर दुसरे काम शोधून तर ठेवूम्हणत ते अमरुल्लाहच्या दुचाकीवरून बाहेर पडले होते. ते घरी औरंगाबादकडे परत जात असताना कारने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. चारचाकीने बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीस धडक देत ती दुभाजकात जाऊन अडकली.