शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडच्या प्रांताधिका-यासह दोन जण लाचेच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:19 IST

कुळ जमिनीसंदर्भात तहसलीदार यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती देण्यासाठी  तक्रारदार शेतकºयाकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत १० हजार रुपये लाच

औरंगाबाद: कुळ जमिनीसंदर्भात तहसलीदार यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती देण्यासाठी  तक्रारदार शेतकºयाकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत १० हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी सिल्लोडचे उपविभागीय(प्रांताधिकारी)सह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही खळबळजनक कारवाई सिल्लोड येथील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात २८ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली.उपविभागीय अधिकारी अनिल गोविंदराव माचेवाड(४२,रा. विटखेडा,औरंगाबाद)आाणि त्यांचे स्वीय सहायक रत्नाकर महादू साखरे(५२,रा. अलका सोसायटी, सिडको एन-९)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या आजोबाच्यानावे वडिलोपार्जित शेती असून त्यांना ती सरंक्षीत कुळत्तने मिळालेली आहे. तक्रारदार यांच्या आजोबाच्यानावे असलेल्या जमिनीबाबत नियमानुसार परवानगी न घेता खोटे खरेदीखत नोंदविण्यात आले होते.याविषयी तक्रारदार यांचे वडिल आणि काकाने दिवाणी कोर्टात केलेल्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर संबंधित खोट्या फेरफारला तत्कालीन तहसीलदार यांनी स्थगिती दिली होती.परंतु सदर कुळ जमिनीच्यासंदर्भाने नवीन आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे कळताच तक्र ारदार यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला आणि उपविभागीय अधिकारी माचेवाड यांच्याकडे अपील दाखल करून तहसीलदार यांच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची विनंती केली. या अपीलानुसार तहसीलदार यांच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यासाठी माचेवाड यांनी त्यांच्या स्वीय सहायक साखरेमार्फत ५० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुपत प्रतिबंधक विभगाकडे तक्रार नोंदविली. यानंतर २८ डिसेंबर रोजी पोलीस  उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक भरत राठोड, सचिन गवळी, विजय ब्राम्हदे, रविंद्र देशमुख, सुनील पाटील, चालक संदीप चिंचोले यांनी उपविभागीय कार्यालयात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता माचेवाड यांनी साखरे यांना भेटण्याचे तक्रारदार यांना सांगितले. यावेळी   कार्यालयातील झेरॉक्स रूममध्ये तक्रारदाराकडून लाचेचे दहा हजार रुपये साखरे यांनी घेतले. आरोपीने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी साखरे यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात अटक केली. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी माचेवाड आणि त्यांचे स्वीय सहायक साखरे यांना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.