शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन नायजेरियन भामटे अखेर गजाआड

By admin | Updated: June 28, 2016 00:58 IST

औरंगाबाद : तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम बंद करण्यात आले आहे, विदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावतो, असे विविध प्रकारचे आॅनलाईन

औरंगाबाद : तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम बंद करण्यात आले आहे, विदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावतो, असे विविध प्रकारचे आॅनलाईन आमिष दाखवून आतापर्यंत अनेक जण गंडविल्या गेले आहेत; परंतु हे भामटे देशभरातील पोलिसांच्या काही हाती लागत नसत. औरंगाबाद पोलिसांनी मात्र, अशीच आॅनलाईन भामटेगिरी करणाऱ्या दोन नायजेरिन ठगांना मोठ्या शिताफीने दिल्लीत जाऊन अटक करण्याची किमया साध्य केली आहे. या भामट्यांनी औरंगाबादेतील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातला होता. उजेह आॅगस्टीन उगो चिक्वू आणि चुक्वीक जॉर्ज (हल्ली मुक्काम दिल्ली) अशी नायजेरियन भामट्यांची नावे आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, समर्थनगर येथील रहिवासी संपदा (नाव बदलले आहे) या ४८ वर्षीय महिलेचे फेसबुक अकाऊंट आहे. इंग्रजी साहित्य विषयात त्या डॉक्टरेट आहेत. फेसबुकवरील त्यांच्या अकाऊंटवरील त्यांचा मोबाईल नंबर मिळवून १५ एप्रिल रोजी त्यांना जेम्स ड्युक नावाच्या भामट्याने त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर संभाषण केले. त्यावेळी त्याने स्वत:ची मरीन टूर्स नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आणि वर्ल्ड क्लास वाईल्डलाईफ अ‍ॅण्ड ग्लेसिअर क्रुईसेस ही शिपिंग कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीला दिल्ली येथे कार्यालय सुरू करावयाचे आहे. त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या महिलेची आम्हाला कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करावयाची असल्याचे सांगितले. संपदा यांनी तेथे नोकरी करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा त्याने तुमच्या नावाने मलेशिया येथून एक पार्सल पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना मलेशिया येथून एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, तुमच्या नावाने एक पार्सल पाठविण्यात आले आहे. त्या पार्सलमध्ये अडीच लाख अमेरिकन डॉलर, सोन्याची साखळी आणि अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल आणि इतर गॅजेटस् असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर या भामट्याने पुन्हा त्यांना फोन करून एवढ्या (पान २ वर)भामट्याने पंधरा लाख रुपये उकळले. नंतर आणखी तेवढीच रक्कम मागितली. त्यानंतर संपदा यांनी १७ जून रोजी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ४ही शुद्ध फसवणूक असल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेऊन पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्याकडे तपास सोपविला. दिल्लीतील छतरपूर भागातील हॉटेल्स होडल्स येथे नायजेरियन नागरिकांची २४ जूनच्या रात्री पार्टी होती. या पार्टीला दोन्ही भामटे उपस्थित असल्याचे फौजदार वाघ आणि कुरुंदकर यांना समजले. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांचे एक पथक सोबत घेऊन आरोपींना पकडण्यासाठी हॉटेलबाहेर सापळा रचला. ४रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन्ही भामटे हॉटेलमधून बाहेर पडले आणि रिक्षात बसले. त्यावेळी फौजदार वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी उजेह आॅगस्टीन हा पळून जाऊ लागला. वाघ यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. वाघ यांनी त्यांच्याकडील पिस्तूल आरोपीच्या कानावर रोखले तेव्हा तो शांत झाला आणि चुक्वीक जॉर्ज याने पोलिसांचा रुद्रावतार पाहून शरणागती पत्करली.