संतोष अशोक भालेराव (वय २६, रा. नक्षत्रवाडी ) असे आरोपीचे नाव आहे. सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, अंमलदार नरसिंग पवार, संतोष मुदीराज आणि इरफान खान हे गस्तीवर असताना संतोष त्यांना संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने टीव्ही सेंटर परिसरात उभी असलेली मोटारसायकल चोरून नेल्याची कबुली दिली. नंतर त्याने मोटारसायकल एन-९ सिडको येथे सोडून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली. याशिवाय न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याची आणखी चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने वेदांतनगर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. ही दुचाकी लपवून ठेवलेली जागा पोलिसांना दाखविली. ही मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. आरोपी भालेराव पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा आहे.
चोरट्याकडून दोन मोटारसायकल जप्त
By | Updated: November 28, 2020 04:16 IST