शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोघांना पोलिसांनी केली अटक

By admin | Updated: August 25, 2016 23:46 IST

परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील ४ कोटी ९५ लाख रुपयांचे १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली

परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील ४ कोटी ९५ लाख रुपयांचे १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, त्यांना गुरुवारी परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे़परभणी येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधून ४ कोटी ९५ लाख रुपयांचे धान्य गायब झाल्या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांच्या फिर्यादीवरून गोदामपाल अनिल आंबेराव व मुकादम शेख महेबुब या दोघांवर यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत़ या प्रकरणात तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडून कसून व योग्य पद्धतीने तपास सुरू आहे़ पोलिस कोठडीतील आरोपींकडून केलेल्या चौकशीत पोलिसांच्या हाती दोन महत्त्वपूर्ण नावे लागली़ त्यानुसार पोलिसांनी रेशन दुकानदार वसंत देसाईराव देशमुख (रा़ लोहगाव) व पवन लक्ष्मणराव बनसोडे (रा़परभणी) या दोन आरोपींना बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरून अटक केली़ या दोन्ही आरोपींनी गायब झालेल्या धान्यातील जवळपास २ हजार क्विंटल धान्य विकल्याची पोलिसांची माहिती आहे़ दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ४ झाली असून, दिवसेंदिवस आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़ रेशनचे धान्य ज्या वाहनांमधून नेण्यात आले, ती वाहने, वाहनांचे मालक, चालक आदी सर्वच या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहेत़ याशिवाय रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्यांचीही आता भंबेरी उडाली असून, ते ही पोलिसांच्या रडारावर आहेत़ त्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)दोन आरोपींची पोलिस कोठडी आज संपणारपोेलिसांनी अटक केलेले आरोपी अनिल आंबेराव व शेख महेबुब यांची पोलिस कोठडी २६ आॅगस्ट रोजी संपणार आहे़ त्यामुळे पोलिस पुढील पोलिस कोठडी वाढवून मिळावी, यासाठी त्यांना शुक्रवारीही न्यायालयासमोर उभे करणार आहेत़ दोन्ही कार्यालयांनी जमा केले रेकॉर्डजिल्हा पुरवठा अधिकारी व परभणी तहसील या दोन्ही कार्यालयांना दोन वेळा पोलिसांनी गोदामांशी संबंधित रेकॉर्ड मागूनही ते मिळाले नव्हते़ याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करताच दोन्ही कार्यालयातील कर्मचारी कोतवाली पोलिस ठाण्यात सर्व रेकॉर्ड घेऊन दाखल झाले़ आता उपलब्ध झालेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून बारकाईने तपासणी केली जाणार आहे़ या तपासणीच्या आधारे कशी अनियमितता झाली? अनियमिततेमध्ये कोण कोण होते? या बाबतची माहिती मिळविली जाणार आहे़ ‘लोकमत’च्या वृत्तानंतर तहसील व पुरवठा अधिकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत़ या प्रकरणात पोलिसांकडे दोन गोण्या कागदपत्रे जमा झाली आहेत़