शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याचे दोन महिने सरले, पण गोदावरी पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य आहे. नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदापात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे.

शहागड आणि खडका हे दोन बंधाऱ्यासह विभागातील मोठे प्रकल्प निम्न दुधना ८३ टक्के आणि विष्णुपुरी प्रकल्पात ८८ टक्के पाणीसाठा सध्या आहे. तर जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मनार, निम्न तेरणा, सिना कोळेगाव या सहा प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ३७.११ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ४६ टक्के जलसाठा होता. १ जूनपासून आजवर फक्त १६५ क्यूसेक पाणी धरणात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पात मागील वर्षी २० टक्के पाणी होते. येलदरी प्रकल्पात यंदा ६१ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ३१ टक्के साठा होता. सिद्धेश्वर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ५३ टक्के साठा होता. माजलगाव धरणात ३१ टक्के जलसाठा सध्या आहे. गेल्यावर्षी ५३ टक्के जलसाठा होता. मांजरा प्रकल्पात २२ टक्के साठा असून, मागीलवर्षी ८ टक्के जलसाठा होता. पैनगंगा प्रकल्पात ६६ टक्के साठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के साठा होता. मनारमध्ये ९१ टक्के साठा असून, गतवर्षी ६४ टक्के साठा होता. निम्न तेरणा प्रकल्पात ५६ टक्के साठा असून, गतवर्षी १ टक्के साठा होता. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ८८ टक्के जलसाठा आहे. तो मागील वर्षी ७८ टक्के होता.

मराठवाड्यात यंदा झालेला पाऊस

जुलै महिना संपत आला असून, अद्याप विभागातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांची तहान वाढली आहे. विभागाचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. इतके असून, सध्या एकूण सरासरीच्या ३९३ मि.मी.च्या आसपास पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आजवर ६८ टक्के पाऊस झाल्याची नोंद विभागीय पातळीवर घेण्यात आली आहे.

गोदावरी पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होण्यामागे मूळ कारण म्हणजे, यंदा सह्याद्रीच्या रांगामध्ये मान्सून जास्त प्रमाणात बरसला. नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे. गोदावरी पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे मोठ्या धरणांत कमी जलसाठा आहे. ऑगस्ट महिन्यांत या पट्ट्यांत पाऊस होणे शक्य आहे. असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.