शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने गंडविणारे दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:55 IST

आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि बीएसएनएलमध्ये लिपिक, शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच बेरोजगारांना ९ लाखांचा गंडा घालणा-या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. या टोळीकडून विविध उमेदवारांना दिलेली बनावट नियुक्तीपत्रे, मोबाइल हस्तगत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरटीओ, सार्वजनिक बांधकाम आणि बीएसएनएलमध्ये लिपिक, शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच बेरोजगारांना ९ लाखांचा गंडा घालणा-या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. या टोळीकडून विविध उमेदवारांना दिलेली बनावट नियुक्तीपत्रे, मोबाइल हस्तगत केला.प्रशांत दिनकर जंजाळ ऊर्फ अजय दिनेश पाटील (३३, रा. लासुरा, ता. शेगाव, ह.मु. जळगाव) आणि वैभव भगवान भोसले (१९, रा. करंजवन, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको एन-२ येथील ठाकरेनगर येथे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालविणाºया सुनील जाधव यांची आणि आरोपी प्रशांत ऊर्फ अजय पाटील याची चार महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यावेळी आरोपी सिडको एन-२ येथे राहत होता. जाधव यांनी त्याचा बेरोजगार साला बंडू राठोड आरटीओ कार्यालय पुणे येथे लिपिक पदासाठी ११ लाख रुपये तर सेवक पदासाठी ७ लाख रुपये दर त्याने सांगितला. नोकरीची आॅर्डर हातात मिळाल्यानंतर टोकन म्हणून काही रक्कम आणि रुजू झाल्यावर उर्वरित रक्कम द्यावी, असा व्यवहार ठरला. यावेळी त्यांच्याकडे काम करणाºया सुनील अंभोरे याच्यासह अन्य तीन नातेवाईकांनाही नोकरीसाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली. सर्व पाच उमेदवारांच्या नोकरीची नियुक्तीपत्रे तक्रारदार यांच्या ईमेलवर त्याने पाठविली. मेलवर नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी सर्वांचा पहिला टप्पा म्हणून एकूण ९ लाख रुपये आरोपींना दिले. यातील काही रक्कम चेकने तर काही रोख होती. रक्कम मिळताच दोन्ही आरोपी गायब झाले. त्यामुळे तक्रार नोंदविण्यात आली.