शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 18:17 IST

शहरातील चिकलठाणा आणि जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद, दि. 7 : शहरातील चिकलठाणा आणि जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

रिक्षा उलटल्याने चालक ठार

भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक ठार झाला. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाणा बाजाराजवळ घडला. 

जावेद हमीद शेख (२५,रा. पुष्पक गार्डन,हिनानगर, चिकलठाणा)असे मरण पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जावेद हमीद हा व्यवसायाने रिक्षाचालक होता. बुधवारी रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत अ‍ॅटो रिक्षा चालविली. यानंतर आज सकाळी तो घरी गेला. काही वेळानंतर तो पुन्हा रिक्षा घेऊन घराबाहेर पडला.

चिकलठाणा आठवडी बाजाराजवळून पुढे जात असतानाच अचानक त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक जावेद शेख यांच्या डोक्याला, कानाच्या बाजूने जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी जावेद यास तपासून मृत घोषित केले.  एमआयडीसी सिडको ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक कोलते हे तपास करीत आहे.

जीपने मोपेडस्वारास चिरडले

अन्य एका घटनेत भरधाव जीपचालकाने मोपेडस्वाराला उडवले.या अपघातात मोपेडचालक जागीच ठार झाला. हा भीषण अपघात जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. 

भास्कर जंगबहादूर पांडे(५४,रा. संभाजी कॉलनी, सिडको एन-६)असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, मयत भास्कर हे शहरातील पानटपरीचालकांना बीडी, तंबाखू आणि सोंप,सुपारी विक्री करण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते मोपेडला लटकावलेल्या पिशव्यामध्ये सामान घेऊन विविध टपरीचालकांना माल विक्री करीत होते. 

दुपारी पाऊण ते एक वाजेच्या सुमारास त्यांनी जळगाव रोडवरील रिलायन्स मॉलजवळील एका पानटपरीचालकास माल विक्री केला. यानंतर ते तेथून दुस-या  टपरीचालकाकडे मोपेडने जाऊ लागले. यावेळी सिडकोबसस्थानाकडून हर्सूल टी पॉर्इंटकडे निघालेल्या भरधाव जीपचालकाने त्यांना जोराची धडक दिली.या अपघातानंतर जीपचालक तेथे न थांबता पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी त्यांना घाटीत दाखल केले.तेथील डॉक्टरांनी पांडे यांना तपासून मृत घोषित केले.