शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरवासियांचा दोन तास रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST

साईनगर वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : साईनगर वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, कळमनुरी नगर परिषदेत अथवा उमरा ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा या मागणीसाठी साई नगरवासियांनी साई नगरजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला.मागील १८ ते २० वर्षांपासून साईनगर ही वस्ती आहे. येथे १५०० च्या जवळपास लोकसंख्या आहे. ही वसाहत ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेत समाविष्ठ नाही. त्यामुळे ही वसाहत मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. येथे अंतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पथदिवे नाहीत, पक्के रस्त्े नसल्याने पावसाळ्यात अडचणी येतात. नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पथदिवे नसल्याने रात्री वसाहतीत अंधार असतो. या वसाहतीतील नागरिकांना कोणतेही शासकीय कागदपत्रे मिळत नाहीत. या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अथवा दुसºया ग्रामपंचायतीत ही वसाहत समाविष्ठ करावा, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रास्तारोको करण्यात आला. हा राष्टÑीय महामार्ग असल्याने वाहनाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.ऋषी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून गावठाण आकारबंध केल्यानंतर अभिलेख वेगळे करण्याची कार्यवाही करण्यात येईल. येत्या सात दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. मागणीचे निवेदन साईनगरवासियांनी तहसीलदारांना ३० आॅक्टोबर रोजी दिले होते. निवेदनावर रामराव मुकाडे, भगवान कांबळे, यु.जी. गुजरे, के.पी.इंगळे, डी.डी. वाकडे, ज्योती राठोड, मनोहर गव्हाणे, मनेष बुजूर्गे, सूर्यवंशी, विठ्ठल खरोडे आदींच्या स्वाक्षºया होत्या.