शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन उद्यानांचे बदलणार रूपडे

By admin | Updated: May 14, 2017 23:15 IST

उस्मानाबाद : शहरातील संभाजी उद्यान, जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण केले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : नगर परिषदेकडून शहराच्या विविध भागात लहान-मोठी उद्याने उभारली आहेत. परंतु, उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा झाला. त्यामुळे जवळपास सर्वच उद्यानांना अक्षरश: बकालत्व आले आहे. पालिका निवडणुकीमध्येही विविध पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा ठळकपणे नमूद करण्यात आला होता. त्यानुसार आता शहरातील संभाजी उद्यान, जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण केले जाणार आहे. तर पांढरी स्मशानभूमी परिसरात नवीन उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानांवर सुमारे १ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.शहरातील देशपांडे स्टॅन्डनजीक जिजामाता उद्यान आहे. काही वर्षांपूर्वी या उद्यानावर लाखो रूपये खर्च करून बच्चेकंपनीसाठी खेळण्या तसेच कारंजेही बसविण्यात आली होती. पेवरब्लॉकच्या माध्यमातून पदपाथ तयार करण्यात आला होता. त्यामुळे या उद्यानात नागरिकांची सातत्याने गर्दी असे. परंतु, कालांतराने पालिकेने उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीकडे साफ दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष न दिले गेल्याने सध्या या उद्यानाला अवकळा आली आहे. कारंजाचीही मोडतोड झाली आहे. पदपाथाचे पेवरब्लॉक उखडले आहेत. कंपाऊंडवॉलही जागोजागी ढासळली आहे. अशीच अवस्था संभाजी उद्यानाची झाली आहे. तारेचे कंपाऊंड तुटले आहे. बच्चेकंपनीसाठी बसविण्यात आलेल्या खेळण्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. पाण्याअभावी गवतही नाहीसे झाले आहे. तारेचे कुंपण तुटल्याने उद्यानात मोकाट जनावरांचा वावर असतो. तसेच आजुबाजुचे नागरीक वाहनेही उद्यानात उभी करतात. दरम्यान, या दोन्ही उद्यानांचे आता रूपडे बदलणार आहे. पालिकेकडून यासाठी सुमारे एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. बच्चेकंपनीला आकर्षित करतील, अशी उद्याने निर्माण करण्यात येणार आहेत. उद्यानामध्ये वेगवेगळ्या खेळण्या बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अकार्षक झाडांची लागवडही केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या झाडांचा समावेश असेल. एवढेच नाही तर गवताच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली जाणार आहे. दरम्यान, या दोन उद्यानांच्या विकासासोबत पांढरी स्मशानभूमी परिसरात नवीन उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. या तीन उद्यानांसाठी मिळून तब्बल १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.