शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन उपोषणार्थी चढले टॉवरवर

By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST

बीड : धारुर तालुक्यातील चिंचपूर येथे पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होते.

बीड : धारुर तालुक्यातील चिंचपूर येथे पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होते. बुधवारी उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. गुन्हे नोंदविण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्ते खाली आले.चिंचपूरमध्ये २००९- १० मध्ये भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविली होती. या योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याचा आरोप करुन गावातील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण यांनी समिती नेमून चौकशीचे आदेश काढले. याउपरही उपोषणकर्त्यांनी माघार घेतली नाही. बुधवारी उपोषणाचा दहावा दिवस होता. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशोक हंडीबाग, सदाशिव साखरे हे कार्यालय आवारातील राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) टॉवरवर चढले. त्यांनी सोबत दोरखंडही नेला होता. सकाळी सात वाजता काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यानंतर सीईओ नामदेव ननावरे, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपअधीक्षक गणेश गावडे पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण तेथे आले. त्यांनी उपोषणकर्त्यांना टॉवरवरुन खाली उतरण्यासाठी गळ घातली;परंतु गुन्हे नोंद होईपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. ननावरे यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर उपोषणकर्ते खाली उतरले. (प्रतिनिधी)सीईओ ननावरे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या अंमजबजावणीत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपअभियंता एम. व्ही. थोरात यांना गुन्हा नोंदविण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले;परंतु रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. गुन्हा नोंदविण्याच्या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत. त्यांनी ‘शोलेस्टाईल’ आंदोलनानंतर पुन्हा उपोषण सुरुच ठेवले आहे.