शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन डॉक्टरांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद आल्हाट आणि सिद्धनाथ वडगाव (ता.गंगापूर) प्राथमिक आरोग्य कें द्राचे वैद्यकीय अधिकारी

औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद आल्हाट आणि सिद्धनाथ वडगाव (ता.गंगापूर) प्राथमिक आरोग्य कें द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव सोनकांबळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे आदेश सोमवारी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. डॉ. सोनकांबळे यांनी जि. प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार नोंदविली होती.जिल्हा परिषदेची १२ फेब्रुवारी रोजी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सदस्यांच्या मागणीवरून जि. प. अध्यक्षांनी हे आदेश दिले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जि. प. उपाध्यक्ष दिनकर पवार, शिक्षण सभापती विनोद तांबे, बांधकाम आणि अर्थ सभापती संतोष जाधव, महिला व बालकल्याण सभापती सरला मनगटे, शीला चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, वासुदेव सोळंके यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी सर्वप्रथम लासूर स्टेशन आणि वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल जि. प. सदस्य रामदास पालोदकर यांनी उपस्थित केला. तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी चौकशी अहवालाचे सभागृहासमोर वाचन केले.या चौकशी अहवालानुसार लासूर स्टेशन येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. आल्हाट हे केवळ तोंडी सांगून एका लग्न समारंभासाठी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अधिकृत रजा टाकलेली नव्हती. तर त्याच दिवशी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णास उपचारासाठी घेऊन गेलेले जि. प. सदस्य मनाजी मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविणारे डॉ. सोनकांबळे हेसुद्धा परवानगी न घेताच तेथे रुग्णसेवेसाठी हजर असल्याचे चौकशीत समोर आले.