शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ६९०० वर

By admin | Updated: June 11, 2017 00:29 IST

नांदेड : सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मंदावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मंदावली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ७ हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत.मे महिन्यात खत-बियाणांची खरेदी करुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात आणली. त्यामुळे गेल्या महिन्याअखेर जवळपास २ लाख ४० हजारांवर पोती हळदीची बाजारपेठेत आवक झाली होती. मात्र आता शेतकरी पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून आवक कमी झाली आहे. त्यामुळे हळदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.आजघडीला जवळपास जिल्हाभरातील सर्व शेतकऱ्यांची हळद काढली असून पेरणीच्या तयारीसाठी बळीराजा मशागतीत गुंतला आहे. पेरणीसाठी बी-बियाणे, खते व औषधांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून हळदीचे भाव ५ हजार ते ६ हजार रुपयांवर येऊन ठेपले होते, परंतु आवक घटल्याने शुक्रवारी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत लिलाव बाजारात हळदीची विक्री झाली. त्यामुळे दरात वाढ होण्याचे चित्र दिसत आहे.मोंढा यार्डामध्ये दिवसाकाठी जवळपास ४ ते ५ हजार क्विंटल हळदीची आवक होत होती, मात्र आता एक ते दीड हजार पोतीच हळद दाखल होत आहे. गतवर्षीचा विचार केल्यास या हंगामात हळदीची मोठी आवक वाढल्याचे दिसत आहे.