शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दावरवाडीत दोन दरोडे

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

पाचोड : दावरवाडी : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील खळवाडीत दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चाकूचा धाक दाखवून चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

पाचोड : दावरवाडी : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील खळवाडीत दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चाकूचा धाक दाखवून चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी भल्या पहाटे घडली. दोन ठिकाणी पडलेल्या दरोड्यांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या मारहाणीत चारजण जखमी झाले.पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भगवान किसनराव काळे, रा. दावरवाडी खळवाडी यांच्या घरी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी खिडकी उघडून आत प्रवेश केला व भगवान काळे यांची सून हिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यानंतर दरोडेखोरांनी घरात असलेल्या पेटीतील नगदी दहा हजार रुपये काढून घेतले व जवळच असलेल्या ज्ञानेश्वर काळे यांच्याकडील मोबाईल हिसकावला व दरोडेखोर पसार झाले. यानंतर त्यांनी आपला मोर्चा मनोहर घोडके यांच्या घराकडे वळवला. पहाटे साडेतीन वाजता यांच्या घराचा दरवाजा उघडला; पण घरात झोपलेले मनोहर घोडके यांचा परिवार आवाज आल्यामुळे जागा झाला. त्याचवेळी चार दरोडेखोरांनी मनोहर घोडके यांच्या गळ्याला चाकू लावला व लताबाईचे तोंड दाबले. यावेळी मनोहर घोडके व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. घोडके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण एका दरोडेखोराने लोखंडी गजाने घोडके यांना मारहाण केली. यानंतर दरोडेखोरांनी घरातील दोन लोखंडी पेट्या उचलून पोबारा केला. त्यात लताबाईच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र, पेटीत ठेवलेले नाकातील एक सोन्याची नथ, नगदी दहा हजार रुपये व वीस सहावार साड्या होत्या. यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, फौजदार आर.डी. खुणे, जमादार काशीनाथ लुटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. (वार्ताहर)पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाचोड पोलीस दरोडा प्रतिबंधक पथक व गुन्हा शाखा यांचे पथक तयार केले. पाचोड परिसरातील सोनवाडी, साळवडगाव वडजी, खंडाळा, चौंढाळा, टाकळी अंबड, शिवारात पारधी वस्तीवर छापे टाकले.कोम्बिंग आॅपरेशनमध्ये एका संशयीत दरोडेखोराला ताब्यात घेतले असून त्यास पाचोड पोलीस ठाण्यात आणले आहे. मारहाणीत ज्ञानेश्वर काळे, त्यांचे वडील भगवान काळे, मनोहर घोडके, लताबाई घोडके जखमी झाले आहेत.