शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मधील एमआयएमचे दोन नगरसेवक कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:30 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आज एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी त्या दोघांनाही ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आज एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी त्या दोघांनाही ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली.मात्र, त्यानंतर त्या दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले. परिणामी त्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.महापालिकेच्या १६ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक २० चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घालून महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकाºयांनी त्या दोघा नगरसेवकांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि खुर्ची फेकून मारली, असे जाधव यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यावरून वरील दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. घटनेपासून वरील दोघे फरार होते. पोलिसांनी त्यांना आज (दि.५ जानेवारी) अटक करून न्यायालयात हजर केले व त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्याची विनंती केली. त्यावरून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना विशेष सरकारी वकील रवींद्र अवसरमोल आणि किशोर जाधव यांनी विरोध केला. वरील दोघांविरुद्ध यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकून तपास कामात अडथळा निर्माण करू शकतात. त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघांचेही जामीन अर्ज नामंजूर केले. परिणामी पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी केली.