शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

सेनेचे दोन सदस्य गायब

By admin | Updated: March 20, 2017 23:49 IST

उस्मानाबाद / उमरगा : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एकाही प्रमुख पक्षाकडे बहुमत नाही़

उस्मानाबाद / उमरगा : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एकाही प्रमुख पक्षाकडे बहुमत नाही़ सत्तेसाठी युती-आघाडीबाबत बैठकांचे फड रंगले असून, नेतेमंडळींचा कस लागला आहे़ २१ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी होत असून, कोणता पक्ष सत्तेत येणार ? याबाबत कमालीची उत्सुकता आहे़ याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमरगा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्य गायब झाले आहेत़ विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते तथा आ़ प्रा़ तानाजी सावंत यांनी या दोन्ही सदस्यांना फूस लावून अपहरण केल्याचा आरोप उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी केला आहे़ याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून, सदस्यांना परत आले नाहीत तर पोलिसांच्या विरोधातच २१ मार्च रोजी उमरगा येथे रास्तारोको व जिल्हा बंद करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे़५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला २६, काँग्रेस पक्षाला १३, शिवसेनेला ११, भाजपाला ४ तर भारतीय परिवर्तन सेनेला एका जागेवर यश मिळाले आहे़ बहुमतासाठी असलेला जादुई २८ चा आकडा गाठण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत़ सर्वाधिक जागा असलेल्या राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी आघाडी-युतीच्या बैठकांसह सदस्य फोडाफोडीचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे़ आजवर अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणत्याच पक्षाकडून आपण सत्ता स्थापन करू असा दावा करण्यात आलेला नाही़ त्यामुळे सत्तेत कोणता पक्ष बसणार ? सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही इतर पक्ष सत्तेतून बाहेर ठेवणार का ? भाजपा कोणासोबत जाणार ? की एखाद्या पक्षाचे सदस्य विरोधकांशी हात मिळवणी करणार ? यासह इतर अनेक प्रश्नांचा ‘सस्पेंस’ कायम आहे़विशेष म्हणजे २१ मार्च रोजी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी होत आहेत़ या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमरगा तालुक्यातील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कवठा गटातून विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य शेखर गोविंदराव घंटे व मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असलेल्या कानेगाव गटातून विजयी झालेल्या सदस्या चंद्रकला भिमराव नारायणकर हे दोन सदस्य बेपत्ता आहेत़ या दोन्ही सदस्यांना शिवसेनेचे उपनेते आ़ प्रा़ तानाजी सावंत यांनी फूस लावून त्यांचे अपहरण केल्याचा आरोप सेनेचेच उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी केला आहे़ याबाबत उमरगा पोलीस ठाण्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे २० मार्च रोजी तक्रार करण्यात आली आहे़ बेपत्ता असलेल्या दोन्ही सदस्यांच्या जिवाला धोका असून, त्यांना तात्काळ संरक्षण देणे गरजेचे आहे़ हे सदस्य सोमवारी सायंकाळपर्यंत परत आले नाही तर पोलिसांचा निषेध म्हणून २१ मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने उमरगा शहरातील हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात रास्तारोको आंदोलन व शिवसेनेच्या वतीने जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे़ यापूर्वीही शिवसेनेतील गटबाजी वेळोवेळी चव्हाट्यावर आली असून, एकमेकांचे पुतळे जाळण्याचे प्रकारही झाले होते़ आता थेट उपनेत्यांनीच सदस्यांचे अपहरण केल्याचा आरोप तालुकाप्रमुखांनी केल्याने पक्षातच मोठी खळबळ उडाली आहे़ दरम्यान, आ़ प्रा़ तानाजी सावंत यांच्याविरूध्द तक्रार देणारे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी सोमवारी सायंकाळी स्वत:च दिलेली तक्रार मागे घेतली़ शहापुरे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारपर्यंत सदस्य मिळतील, असे आश्वासन दिल्याने आपण पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेतल्याचे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)