शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अडीच हजार प्रस्ताव

By admin | Updated: August 24, 2014 23:48 IST

गंगाधर तोगरे, कंधार गाव निर्मल करण्यासाठी नरेगा व निर्मल भारत अभियान अशी सांगड घालण्यात आली आहे़

गंगाधर तोगरे, कंधारगाव निर्मल करण्यासाठी नरेगा व निर्मल भारत अभियान अशी सांगड घालण्यात आली आहे़ अवघ्या काही तासातच १८६१ अर्ज गावकऱ्यांनी दाखल केले़ जवळपास २ हजार ५४५ प्रस्ताव दाखल झाले असून योजना गतिमान करण्यासाठी गटविकास अधिकारी, मिनी गटविकास अधिकारी आदींनी कंबर कसली आहे़स्वच्छतेतून समृद्धी, निरोगीपणा निर्माण करण्याचा शासन स्तरावरून प्रयत्न केला जात आहे़ गावात सुखसमृद्धीचा मंत्र यशस्वी करण्यासाठी नरेगा-निर्मल भारत अभियानाची योग्य साथ घेतली गेली आहे़ अल्पभूधारक महिला कुटुंब प्रमुख आदी लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ नरेगांतर्गत ५ हजार ४०० व निर्मल भारतमधून ४ हजार ६०० असे एकूण १० हजारातून शौचालय आकाराला येणार आहे़ त्यामुळे मे पासून आजपावेतो तब्बल २ हजार ५४५ प्रस्ताव दाखल झाले़ विशेष म्हणजे १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेतून अर्ज मागविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला़ अवघ्या काही तासांत १८६१ लाभार्थ्यााचे अर्ज दाखल झाले़कारतळा-३१, गुलाबवाडी २६, दैठणा ५७, हरबळ ८, जाकापूर १२, महालिंगी ३२, रूई १०, घागरदरा ९५, चिंचोली १०, चौकी महाकाया १४, गोगदरी १२, मंगनाळी १०, बाभूळगाव १९, मादाळी ५८, खंडगाव १०१, पांगरा ४६, भोचूचीवाडी २७, नंदनवन ३४, शिरूर १७, लाडका १०, भूकारी ७, कल्हाळी १९, गुंडा-बिंडा-दिंडा १०, आंबुलगा २८, हरसूळ १०, धानोरा कौठा ११, गंगनबीड १०, हरबळ पक़़-८, मानसपुरी १०, रामानाईकतांडा, २२, नारनाळी १९, घोडज ६१, फुलवळ १६, वहाद ७, गोणार १, तेलूर ५, नंदनशिवणी १०, बोरी खु़११, चिखली २७, मोहिजा (प़) २२, शिरसी (खू़), १२, दिग्रस ५९, शिराढोण ३०, उस्माननगर ५४, कुरुळा २२, नावंद्याचीवाडी १८, येलूर १५, हिप्परगा (शहा)-१७, बोळका १०, पाताळगंगा ११, मंगनाळी २०, तळ्याचीवाडी १२२, तेलंगवाडी ५, सावरगाव (नि़) १८, कळका १०, बोरी बु़ १२, सावळेश्वर २२, पेठवडज ८७, चिखलभोसी १७५, खुड्याचीवाडी १२, चौकी धर्मापुरी २३, दाताळा ६४, बारूळ २३, रहाटी १२, तेलंगवाडी २९, दहीकळंबा १९, लालवाडी ५९, काटकळंबा १७, उमरज ४८, संगुचीवाडी १०, पानभोसी १४४, शेकापूर १०, बाळांतवाडी ३६, मंगलसांगवी १९, कंधारेवाडी ४१० आदी गावचे प्रस्ताव दाखल झाले़ निर्मल गावे करण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप सोनटक्के व विद्यमान गटविकास अधिकारी अनंत कदम यांनी पुढाकार घेतला़ आता मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे़ प्रत्यक्ष सर्कलनिहाय मिनी बीडीओ संकल्पना राबविली जात आहे़ सर्व योजनेची कामे करण्यात यावीत, गावात योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी, गावकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी, एका गावात मंगळवारी मुक्कामी राहणे, रात्री ग्रामसभा घेणे आदी कामासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ म्हणून मिनी बीडीओ प्रदीप सोनटक्के (कौठा), शेख लतीफ (फुलवळ), गोविंद मांजरमकर (बहाद्दरपुरा), शरद बेलदार (शिराढोण), राम चोंडे (कुरुळा) व गणपत पांडलवाड (पेठवडज) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ शौचालय बांधकामासाठी गती आणण्यात येत आहे़