लातूर : सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या व भटक्या विमुक्त जमातीच्या मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. २ कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या मुलींना देण्यात आली आहे. शिवाय, राजर्षी शाहू गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेत २३१२ विद्यार्थ्यांना ६९ लाख ३६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी होत आहे. त्यानिमित्त या शिष्यवृत्तीचे वाटपही करण्यात येणार आहे. २०१३-१४ मध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लातूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली. ५ वी ते ७ वीच्या अनुसूचित जातीतील १३९१५ मुलींना दरमहा ६० रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. तर विमुक्त जाती जमातीच्या ११ हजार ९६ मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. एकूण २५ हजार ११ विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला. १५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा करण्यात आली. ८ वी ते १० वीच्या मुलींसाठीही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात आली असून, अनुसूचित जातीच्या ११ हजार ६५४ व विमुक्त भटक्या जाती जमातीच्या ९ हजार ७८४ अशा एकूण २१ हजार ४३८ मुलींना प्रतिमाह १०० रुपयांप्रमाणे वर्षाला १००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. २ कोटी १४ लाख ३८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या मुलींना वाटप करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)राजर्षी शाहू गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती...छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनाही राबविण्यात आली असून, दहावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ९५३ व विमुक्त भटक्या जाती-जमातीच्या १३५९ विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी ३ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीतून ६९ लाख ३६ हजार रुपये वाटप करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.आर. दाणे यांनी दिली.
मुलींना अडीच कोटींची शिष्यवृत्ती
By admin | Updated: June 26, 2014 00:37 IST