शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

By admin | Updated: June 12, 2017 00:01 IST

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़

श्रीनिवास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली आहे़ सदर निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले़ दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शहरात येणारे दूध, भाजीपाला बंद करून तो रस्त्यावर फेकून देत शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला़ त्यातच सरकारने अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत आंदोलनाची तीव्रता कमी केली़ परंतु, शेतकरी संघटनांनी तो मान्य नसून सरसकट कर्जमाफीच पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलन सुरू केले़ या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला़ त्यातच रविवारी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तत्त्वत: कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खासगी व सरकारी बँकांचे जवळपास एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज आहे़ यामध्ये पीककर्ज खरीप, रबीच्या कर्जाचा समावेश आहे़ तसेच एचडीएफसी, एक्सीस, कर्नाटका, करूर वैश्य, डीसीबी, कोटक महिन्द्रा बँक अशा खासगी बँकांचे १ लाख ४६ हजार ५९७ शेतकऱ्यांनी १ हजार १३२ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र सहकारी बँक व जिल्हा बँक असे मिळून ६८ हजार ७५९ शेतकऱ्यांंकडे १५१ कोटी ३९ लाख तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर बँकेचे ४३ हजार २८ शेतकऱ्यांकडे जवळपास २५८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज आहे़ खाजगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर असून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे़ सदरील कर्ज हे पीककर्ज स्वरूपात आहे़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करू नये असा निर्णय असूनदेखील काही बँकांनी बँकेत जमा झालेल्या पीकविम्यातून कर्जाचे हप्ते कपात करून घेतले आहेत़ कर्जमाफीमुळे पीकविम्यातून कपात केलेली रक्कम कशी परत मिळणार, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे़